भारतीय औषध महानियामक मंडळ (DCGI) अखेर परदेशी लशींचा देशात वापर करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे आता मॉडर्ना आणि फायझर या लशींचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जागतिक आरोग्य संघटना आणि इतर देशांनी मान्यता दिलेल्या लशींची आयात करण्यासाठी आता ट्रायलची गरज नसेल, असे DCGI ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता अमेरिका, इंग्लंड आणि जपानमध्ये मान्यताप्राप्त लसी भारतात आणल्या जाऊ शकतात.
यापूर्वी भारताने रशियन बनावटीच्या स्पुटनिक व्ही या लसीच्या वापराला मान्यता दिली होती. 15 जूननंतर या लसीच्या वापराला सुरुवात होणार आहे. याशिवाय, रशियाचीच स्पुटनिक लाईट ही लसही लवकरच भारतात येण्याची शक्यता आहे. या लसीची केवळ एक डोस पुरेसा असेल. डॉ. रेड्डीज कंपनीकडून भारतात या लसींची निर्मिती आणि वितरण करण्यात येणार आहे.