Vidharbha

मेळघाटात आगीमुळे पाच आदिवासींच्या घरांची झाली राखरांगोळी

Published by : left

सूरज दाहाट, अमरावती | अमरावती (Amravati) जिल्ह्यातील मेळघाटात आदिवासींच्या घरांना (Tribals House) आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत पाच घरे जळून खाक झाली आहेत. या आगीत आदिवासीयांना फार मोठी वित्तहानी झाली आहे. आगीचे कारण अद्याप समोर आले नाही आहे. दरम्यान महसूल विभाग व तलाठी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह नजीकच्या माखला गावात (Makhala gaon) आज दुपारी  अचानक लागलेल्या आगीत पाच घरांची राखरांगोळी झाली.आग लागल्याचे समजताच आदिवासींनी एकच धावपळ केली मात्र तो पर्यंत पाच घरे जळून खाक झाली होती. बाबूलाल  बेठेकर, गणेश बेठेकर, साबूलाल बेठेकर ,चंदन बेठेकर ,संजू बेठेकर अशी घरे जळालेल्या आदिवासींची नावे आहे.

मेळघाटात (Melghat) उन्हाळ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात आदिवासी पाड्यांमध्ये झोपड्यांना आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. शॉर्टसर्किट पेक्षा घरातीलच चुलीचा विस्तव वाऱ्यामुळे ठीनगी उडाल्याने आग लागत असल्याचे आतापर्यंत उघडकीस आले आहे. त्यामुळे मेळघाटातील अतिरिक्त अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्याची मागणी यावेळी आदिवासी बांधवांनी केली आहे. सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटात उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई राहते,आदिवासींना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो मात्र अश्या स्थितीत जर आग लागली तर आग विझवण्यासाठी पाणीही नसते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी होते.

आगीच्या ज्वाळा हवेत दूरून दिसताच गावातील आदिवासी हल्लाकोळ करत धावत सुटले. पूर्वीच आदिवासींची घरे एकाला एक लागून असल्यामुळे एका घराने आग धरतात दुसऱ्याने ही पेट घेतला.त्यामुळे हातात मिळेल ते भांडे पाण्याने भरून विझविण्याचा एकीकडे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे एवढं सामान वाचवता येईल तेवढे बाहेर काढण्यासाठी आगीतही युवक घरावर चढले. माखला गावातील घरांना लागलेल्या आगीत कपडे बिस्तरे धान्य व इतर घरगुती साहित्य पूर्णतः जळून राख झाले आहे. महसूल विभागाची चमू व तलाठी घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी पोहोचले असल्याची माहिती आहे.

Black circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी