India

दिल्ली पोलिसांकडून पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग विरोधात FIR?

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क

दिल्लीच्या वेशीवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्रानं आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात हे आंदोलन सुरू आहे. पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग विरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. भारतातील शेतकरी आंदोलना संदर्भात केलेल्या टि्वटमुळे ग्रेटा थनबर्ग विरोधात हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाच्या टि्वटनंतर ग्रेट थनबर्गने भारतातील शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचे टि्वट केले होते. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी यावर "आम्ही FIR मध्ये कोणाचेही नाव घेतलेले नाही हे केवळ टूलकिटच्या निर्मात्यांविरूद्ध आहे, जे तपासाचा विषय आहे. दिल्ली पोलिस खटल्याची चौकशी करणार असे सांगण्यात आले.

ग्रेटा थनबर्गने मंगळवारी रात्री टि्वट करताना भारतातील शेतकरी आंदोलकांच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहोत, असे म्हटले होते. त्याचवेळी तिने या आंदोलना संदर्भातील सीएनएनचा लेखही शेअर केला होता. रिहानाच्या पाठोपाठ ग्रेट थनबर्गने केलेल्या टि्वटमुळे जगाचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले.

एफआयआरमध्ये ग्रेटा थनबर्गवर १५३ अ (धर्माच्या आधारावर वेगवेगळया गटांमध्ये वैरभाव निर्माण करणं) आणि कलम १२० ब (गुन्हेगारी कट रचण) या कलमातंर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.

रिहाना, ग्रेटा थनबर्गच्या टि्वटनंतर देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. देशात दोन गट पडल्याचे चित्र आहे. बॉलिवूडसह क्रिकेट जगतातील अनेकांनी भारतातील आंदोलनाबद्दल टि्वट करणाऱ्या परदेशी सेलिब्रिटींविरोधात जाहीर भूमिका घेतली आहे. #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda या हॅशटॅग अंतर्गत अनेकांनी देशाच्या एकजुटीची हाक दिली आहे. शेतकरी हा देशाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जात आहे. मतभेद निर्माण करणाऱ्या प्रत्येकाकडे लक्ष देण्यापेक्षा #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda" अशा आशयाचे ट्वीट अक्षयने केले आहे.

ग्रेटा थनबर्ग भूमिकेवर ठाम

यावर ग्रेटा थनबर्गने टि्वटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली असून "मी शेतकऱ्यांसोबत आहे. त्यांच्या शांतीपूर्ण आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. कुठलाही द्वेष, धमकी किंवा मानवी हक्काच्या उल्लंघनामुळे यात बदल होणार नाही" असे ग्रेटा थनबर्गने म्हटले आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news