नमित पाटील, पालघर | केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले असून हे शेतकऱ्यांच यश असल्याचं मत शेतकरी नेते राकेश टीकैत यांनी व्यक्त केले आहे. तर एम.एस.पी. वर निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच राहील असा इशाराही टीकैत यांनी यावेळी दिला.
बिरसा मुंडा यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त पालघरमध्ये आज भूमी सेना, आदिवासी एकता परिषदेच्या पुढाकाराने जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त पालघर रेल्वे स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढण्यात आली होती.या उत्सवाला राकेश टीकैत पालघरमध्ये उपस्थित होते.
जोपर्यंत एम.एस.पी. वर निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच राहील असा इशाराही टीकैत यांनी यावेळी दिला. मोदी सरकार खाजगीकरणावर जास्त भर देत असून सध्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपचा उतरता क्रम पाहता मोदी सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याचे यावेळी टीकैत म्हणाले. कायदे मागे घेण्याची घोषणा केलीय मात्र त्यावर चर्चा होऊन च निर्णय होईल. जो पर्यंत समाधान होणार नाही तो पर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
येत्या 28 तारखेला आम्ही मुंबईत मध्ये येणार आहोत तुम्ही आवाज दिला तर दिल्लीत जेवढे ट्रॅक्टर आहेत ते सर्व इथे येतील आणि यापुढेही देशात संयुक्त मोर्चा लढा देईल. इतकंच नव्हे तर शेतकऱ्यांना पाकिस्तान आणि खलिस्तान म्हटलं हे कसं विसरून चालेल, असे टीकैत म्हणाले.