पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात कृषी कायदा ही तिन्ही विधेयक मागे घेण्याची घोषणा केली. हे कायदे मागे घेण्याची प्रक्रिया संसदेच्या अधिवेशनात सुरू होईल, पंतप्रधानांनी म्हटले आहे. या घोषणेनंतर आता देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत, शेतकरी दिल्लीच्या सींमावर आंदोलन करत राहिले त्यासंदर्भात शेतकऱ्यांचं अभिनंदन करते, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.
शेतकऱ्यांना राजकीय नेत्यांनी आंदोलनजीवी म्हटलं, शेतकऱ्यांना गुंड म्हटलं गेलं. नरेंद्र मोदी आंदोलनजीवी म्हणाले. शेतकऱ्यांना अटक केलं जातं होतं. आज तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा. या सरकारला देशात शेतकऱ्यांशिवाय कोणीही मोठं नाही हे समजलं आहे. ज्या शेतकऱ्यांनी या आंदोलनादरम्यान जीव गमावला त्यांना आदरांजली आहे. केंद्रीय मंत्र्याला बरखास्त केलं पाहिजे. संपूर्ण देशात शेतकऱ्यांचा आवाज आहे त्या सोबत आपल्याला उभं राहावं लागेल. रासायनिक खतं मिळवताना रांगेत शेतकऱ्यांनी जीव गमावला आहे, असं प्रियांका गांधी म्हणाल्या. सर्व राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला. शेतकरी दिल्लीच्या सींमावर आंदोलन करत राहिले त्यासंदर्भात शेतकऱ्यांचं अभिनंदन करते, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. मात्र, मोदी सरकारची नियत सर्वांना माहीत आहे. त्यामुळे मोदींच्या निर्णयावर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केला. मोदी सरकार अध्यादेश का आणत नाही? निवडणुका लागल्यावरच अध्यादेश काढणार का? असा सवालही प्रियंका यांनी केला.