माहिती तंत्रज्ञानाविषयी संसदेच्या स्थायी संसदीय समितीने फेसबुक आणि गुगल इंडियाच्या प्रतिनिधींना आज बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे. या बैठकीत नागरिकांच्या अधिकारांची सुरक्षा आणि सोशल ऑनलाईन न्यूज मीडिया प्लॅटफॉर्मच्या चुकीच्या वापरावर बंदी घालण्यासंबंधत दोन्ही कंपन्यांची मते ऐकून घेतली जाणार आहेत. शशि थरुर यांच्या अध्यक्षतेखालील या पॅनलच्या सदस्यांदरम्यान या संदर्भातील एक अधिकृत अजेंडा मांडला होता.
यापूर्वी फेसबुकचे प्रतिनिधींनी संसदीय समितीला सुचित केले होते की, त्यांच्या कंपनीचे नियम कोविड19 प्रोटोकॉलच्या कारणास्तव अधिकाऱ्यांना व्यक्तीगत रुपात उपस्थितीत राहण्याची परवानगी देत नाही. मात्र पॅनलचे अध्यक्ष शशि थरुर यांनी फेसबुकला म्हटले की, त्यांच्या अधिकाऱ्यांना व्यक्तिगत रुपात हजर रहावे लागणार आहे. कारण संसद सचिवालय वर्च्युअल बैठकींना परवानगी देत नाही.