पुणे मेट्रोचे उद्घाटन, मुळा-मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारणाची पायाभरणी, यांसह अनेक प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी पुण्यात आले होते व त्यांच्या हस्ते पुणे आणि पिंपरी-चिंचवड मेट्रोचे उद्घाटन झालं.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या विषयावर बोलताना म्हणाले, "काही लोक राजकीय श्रेयासाठी अनेक प्रकल्पांची उद्घाटनं करतात पुण्याच्या मेट्रोचं उद्घाटन हा त्याचाच एक भाग आहे. काही मोठे प्रकल्प हे विद्यमान सरकारच्या काळातच पूर्ण होतात असं नाही. मात्र उद्घाटन प्रसंगी त्या तत्कालीन सरकारचा देखील विचार होणं गरजेचं आहे. मात्र आज चाललेला सर्व अट्टाहास जनता पाहत आहे."
मेट्रोच्या काचांना पहिल्याच दिवशी तडे:
पुणे आणि पिंपरी-चिंचवड च्या मेट्रोचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झालं असलं तरीही, पिंपरी ते फुगेवाडी येथील मेट्रोच्या दोन ठिकाणच्या कांचांना तडे गेल्याच पुढं आले आहे. यावरूनच मेट्रो सुरू करण्यास घाई तर केली गेली नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.