सिनेमा

Navra Majha Navsacha 2: "नवरा माझा नवसाचा 2" पहिल्याच दिवशी बाप्पाने दिला कौल! पहिल्या दिवशी केली 'एवढी' कमाई

Published by : Team Lokshahi

जून जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रभरात कोणत्या गोष्टीची चर्चा असेल तर ती होती नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची. चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलर पाहिल्यापासून नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली होती. 20 सप्टेंबरला ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’होता आणि त्यानिमित्ताने नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. काल या चित्रपटाचा प्रदर्शनाचा पहिलाच दिवस होता. 20 सप्टेंबर‘राष्ट्रीय चित्रपट दिन’असल्यामुळे या दिवशी चित्रपटगृहात चित्रपटांची तिकिट 99 रुपये करण्यात आली होती.

याचाच फायदा नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाच्या कमाईमध्ये झाला. पहिल्याच दिवशी चित्रपटाला जबरदस्त असा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट मुंबईसोबतच पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, सांगली या जिल्ह्यांमध्ये देखील प्रदर्शित झाला आहे. या ठिकाणाहून देखील नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाला बाप्पाचा आशीर्वाद आणि प्रेक्षकांचा उजवा कौल मिळाला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधी प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहचलेली पाहायला मिळाली होती.

नवरा माझा नवसाचा २ ने पहिल्या दिवशी केलेली कमाई:

2004 मध्ये आलेला नवरा माझा नवसाचा या चित्रपटाला आज ही प्रक्षकांकडून तितकाच चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज ही या चित्रपटाचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्या काळात नवरा माझा नवसाचा या चित्रपटाने 5 कोटींपर्यंतची कमाई केली होती. तर नुकताच प्रदर्शित झालेला नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2 ते 3 कोटींचा पल्ला गाठलेला पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटासाठी मुंबईसह इतर ठिकाणी 1000 हून अधिक चित्रपटगृहांमध्ये नवरा माझा नवसाचा 2 हा सिनेमा प्रदर्शित झाला असून त्यातील 600 पेक्षा जास्त चित्रपटगृह हाऊसफुल्ल झाल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्या दिवशीची कमाई पाहता हा चित्रपट आणखी किती मोठी कमाई करणार आहे याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे. मात्र दुसऱ्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणात या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.

नवरा माझा नवसाचा २ कलाकार:

सचिन पिळगावकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटात पहिल्या भागातील सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले हे कलाकार पाहायला मिळाले आहेत. तर यांच्या संगतीला नव्या जोषात आणि नव्या रंगसंगतीसाठी स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, सिद्धार्थ जाधव, हरीश दुधाणे यांची जबरदस्त साथ पाहायला मिळत आहे. त्याचसोबत जयवंत वाडकर, विजय पाटकर, गणेश पवार, संतोष पवार आणि अली असगर हे देखील पाहायला मिळणार आहेत.

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल

वंचितची विधानसभेची पहिली यादी जाहीर; पहिल्या यादीत 11 उमेदवारांचा समावेश