'धर्मवीर 2' मुंबईसह राज्यभरात आज प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या उत्तरार्धात खरेखुरे मुख्यमंत्री पडद्यावरदिसलेले आहेत. तसेच चित्रपट प्रदर्शनानंतर राजकारण रंगण्याची शक्यता आहे का? असे अनेक प्रश्न चित्रपट प्रदर्शना दरम्यान पडत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच आचार संहिता लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनोरंजन विश्वात देखील राजकीय वारे वाहू लागले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सिनेमात स्वतःचीच व्यक्तिरेखा साकारली आहे, ज्यामुळे सिनेसृष्टीसह राजकीय वर्तुळातही सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांची व्यक्तिरेखा अभिनेता क्षितीश दाते याने चोख निभावली आहेच, परंतु सिनेमाच्या उत्तरार्धात काही मिनिटांनाही दस्तुरखुद्द खरेखुरे मुख्यमंत्री स्वतःच्या व्यक्तिरेखेत पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. ‘धर्मवीर २’ सिनेमाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे या सिनेमात साकारलेली एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे. त्यांच्या दमदार 'डायलॉग'ने सिनेमागृहात टाळ्या-शिट्यांचा सडा पडल्याशिवाय राहत नाही.
युवकांमध्ये यादरम्यान उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे. धर्मवीर 2 च्या ट्रेलरवरून या चित्रपटात काय असणार आहे याची थोडीफार झलक पाहायला मिळाली. धर्मवीर 2 चा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल झाल्याचं पाहायला मिळत आहे, तर सर्व थिएटर हे बुक झाल्याचे देखील पहाायला मिळत आहेत.