सिनेमा

Bhool Bhulaiyaa 3: आता मंजुलिका सिंहासनासाठी लढणार! थरकाप उडवेल "भूल भुलैया 3"चा हा टीझर

'भूल भुलैया 3' च्या मागण्या प्रेक्षकांकडून येऊ लागल्या आणि नुकताच 'भूल भुलैया 3' चा भन्नाट आणि थरकाप उडवणारा टीझर समोर आला आहे.

Published by : Team Lokshahi

2007 मध्ये प्रदर्शित झालेला 'भूल भुलैया' आज ही लोकांच्या मनात जागा तयार करून आहे. या चित्रपटाची क्रेज आजही तितकीच पाहायला मिळते. 'भूल भुलैया'मध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, राजपाल यादव, परेश रावल, अमिशा पटेल, विक्रम गोखले यांसारख्या कलाकारांची केमेस्ट्री पाहायला मिळाली. यानंतर कालांतराने 'भूल भुलैया'चा २०२२ साली दुसरा भाग आला ज्यामध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, परेश रावल, अमिशा पटेल, विक्रम गोखले यांच्या ऐवजी कार्तिक आर्यन, कियारा अदवानी आणि तब्बू हे मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले.

'भूल भुलैया 2' ला प्रेक्षकांकडून जास्त प्रेम मिळाले नाही. यावर कार्तिक आर्यन ट्रोल देखील करण्यात आले. त्यावेळेस 'भूल भुलैया 2' ने बॉक्स ऑफिसवर १८५ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर 'भूल भुलैया 3' च्या मागण्या प्रेक्षकांकडून येऊ लागल्या आणि नुकताच 'भूल भुलैया 3' चा भन्नाट आणि थरकाप उडवणारा टीझर समोर आला आहे. ज्यामध्ये सुरुवातच मंजुलिका या भयानक पात्रापासून करण्यात आली आहे. मात्र टीझर समोर आल्या बरोबर प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली ती म्हणजे या भागात देखील अक्षय कुमारला मुख्य भूमिकेसाठी घेतलं नाही या कारणाने.

मात्र यावेळी विद्या बालन हिने पुनरागमन केल्याचं दिसून येत आहे यावेळी विद्या बालन, कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, राजपाल यादव, संजय मिश्रा, अश्विनी कलसेकर हे मुख्य भूमिकेत दिसून येत आहेत. तर माधुरी दीक्षित देखील या चित्रपटाचा भाग असल्याचं म्हटलं जात होते मात्र अद्याप माधुरी दीक्षितची झलक टीझरमध्ये दाखवण्यात आलेली नाही त्यामुळे माधुरी दीक्षित कोणता नवा ट्विस्ट घेऊन येणार आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच हा चित्रपट दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार असल्याच सांगितल जात आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी