Team Lokshahi
मनोरंजन

World Environment Day : शिल्पापासून प्रिती झिंटापर्यंत हे स्टार्स करतात 'घरीच शेती'

दरवर्षी ५ जून रोजी पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिवशी लोकांना पर्यावरण आणि त्याचे संरक्षण याबद्दल जागरूक केले जाते.

Published by : shweta walge

दरवर्षी ५ जून रोजी पर्यावरण दिन (World Environment Day) साजरा केला जातो. या दिवशी लोकांना पर्यावरण आणि त्याचे संरक्षण याबद्दल जागरूक केले जाते. अशामध्ये बॉलीवूड सेलिब्रिटीही (Bollywood celebrities) मागे नाहीत आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने लोकांना जागरूक करत आहेत. काही जण संस्थेत सहभागी होऊन पर्यावरण स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याचे काम करतात, तर काहींनी स्वत:च्या घरातून एक छोटासा उपक्रम सुरू केला आहे. बी-टाऊनमध्ये (B-Town) असे अनेक स्टार्स आहेत, जे घरी त्यांच्या किचन गार्डनमध्ये (Kitchen garden) भाज्या पिकवतात.

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी अनेकदा तिच्या किचन गार्डनमध्ये (Kitchen garden) पिकवलेल्या भाज्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. शिल्पा अनेकदा भाजी तोडतानाचे व्हिडिओ शेअर करत असते. शिल्पा तिच्या घरात मातीविरहित गार्डनिंग करते, ज्याला हायड्रोपोनिक्स (Hydroponics) म्हणतात.

प्रीती झिंटा (Preity Zinta)

अभिनेत्री प्रिती झिंटालाही तिच्या घरी भाजीपाला पिकवायला आवडते. ती भाजी तोडतानाचे व्हिडिओही शेअर करते. तिला ते आवडते आणि ती स्वतःला शेतकरी म्हणते. त्यांच्या किचन गार्डनमध्ये शिमला मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची यासह अनेक भाज्या आहेत. त्याच वेळी, ती तिच्या शेतात सफरचंद, स्ट्रॉबेरी, संत्रा, पीच, पेरू आणि टोमॅटो पिकवते.

समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhub)

सुप्रसिद्ध दक्षिण अभिनेत्री (Southern actress) समंथा रुथ प्रभू देखील तिच्या घरी भाजी पिकवते. सामंथा शाकाहारी (Vegetarian) आहाराचे पालन करते आणि अशा प्रकारे तिच्या स्वतःच्या घरात मायक्रोग्रीन (Microgreen) उगवते. समांथाने ही पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

जुही चावला ( Juhi Chawla)

या यादीत अभिनेत्री जुही चावलाचाही समावेश आहे. जुही चावलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मेथी आणि टोमॅटो क्लारियांची फोटो शेअर केली आहेत.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती