मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सध्या तिची एक पोस्ट व्हायरल होत आहे. नुकतच एका व्हिडीओमुळे हेमांगीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. त्यानंतर स्त्रींयांना त्यांच्या कपड्यांवरून तसेच अंर्तवस्त्रांवरुन ट्रोल करणाऱ्यांना हेमांगीने चांगलेच सुनावले. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत असून तिला अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला आहे.
हेमांगीने तिच्या फेसबुक अकाऊंटवर 'बाई, बुब्स आणि ब्रा' या शिर्षकाखाली पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने समाजात नेहमी स्त्रीयांवर कपड्यामुळे असणाऱ्या बंधनांच्या प्रश्नावर बेधडक मत मांडले आहे. त्यानंतर प्रवीण तरडे यांनी कमेंट करत हेमांगीला पाठिंबा दिला आहे. "विचार म्हणून खतरनाक ऽऽऽऽ.. लेखन म्हणून वरचा दर्जा …साहित्य म्हणून कालातीत ..तू लढ हेमांगी" अशी कमेंट त्यांनी केली आहे.
तर हेमांगीच्या या पोस्टवर कमेंट करत अभिनेत्री वीणा जामकरनेदेखील पाठिंबा दिलाय. "क्या बात हेमांगी..सॉलिड , लय भारी … वाचून सुद्धा हायसं वाटलं गं …" असं वीणा म्हणाली आहे.त्याची मजा घेऊन गप्प बसतात पण स्त्रिया स्वतः त्यातून जात असताना ही खालच्या स्तराला जाऊन चर्चा करून कुठलं पदक मिळवतात कुणास ठाऊक!"
काय आहे हेमांगीची पोस्ट?
बाई, बुब्स आणि ब्रा
बाईने तिचे बुब्स (स्तन), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे (nipples, tits) आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा choice असू शकतो!
मग ती घरी असो किंवा social media वर किंवा कुठेही!
हाँ त्यावरून judge करण्याचा, त्याबद्दल घाणेरडया चर्चा आणि gossip करण्याचा सुद्धा ज्याचा त्याचा choice!
पण यानिमित्ताने सांगावसं वाटतं…