वादग्रस्त वक्तव्यांमुळे अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच चर्चेत राहते . आता मात्र तिच्या याच गोष्टीमुळे ती अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. मार्च २०२० मध्ये तिने सोशल मीडियावर अनुसूचित जाती व जमातीविषयी टीका केली होती. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी तिने जामिनाकरिता ठाणे न्यायालयात अर्ज केला होता.केतकी चितळे हिचा ठाणे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे.
घणसोली येथील वकील स्वप्नील जगताप यांच्या तक्रारीवरून रबाळे पोलीस ठाण्यात केतकी व सूरज शिंदे या दोघांवर गुन्हा दाखल झाला होता. केतकी हिने सोशल मीडियावर अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तींबाबत अपशब्द वापरले होते. तर तिच्या पोस्टला अनुसरून सूरजने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांच्याविषयी अपशब्द वापरले होते. त्यामुळे या पोस्टबद्दल माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते व वकील जगताप यांनी रबाळे पोलिसांकडे तक्रार केली होती.