मनोरंजन

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर का ट्रेंड होतोय बालिका वधूचा एपिसोड नं.1157

Published by : Lokshahi News

अभिनेता आणि बिग बॉस १३ चा विजेता सिद्धार्थ शुक्ला याचा आकस्मिक मृत्यू झाल्याने संपूर्ण मनोरंजन जगताला धक्का बसला आहे. (Sidharth Shukla) सोशल मीडियावरूनही सिद्धार्थच्या अचानक जाण्याबाबत दु:ख व्यक्त केले जात आहे. (Sidharth Shukla Death)सिद्धार्थचा मृत्यू झालाय, यावर कुणाचाही विश्वास बसत नाही आहे. दरम्यान सिद्धार्थच्या मृत्यूनंतर त्याला ज्या शोमधून ओळख मिळाली त्या बालिका वधूमधील एक भाग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बालिका वधू या मालिकेमध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि प्रत्युषा बॅनर्जी हे कलाकार झळकले होते. प्रत्युषा बॅनर्जीचा मृत्यू २०१६ मध्ये झाला होता. दरम्यान, बालिका वधू या मालिकेचा ११५७ वा भाग आता व्हायरल होत आहे. यामध्ये दोघांच्याही विवाहाचे दृश्य आहे. )

काय आहे या एपिसोडमध्ये?
बालिका वधू या शोमध्ये सिद्धार्थ शिवची आणि प्रत्युषा आनंदीची भूमिका साकारत होते. त्यांच्या विवाहाचे चित्रिकण ११५७ व्या भागात करण्यात आले होते. यावेळी विवाहामधील अनेक विधी आणि काही रोमँटिक गमती-जमतीही दाखवण्यात आल्या होत्या. यामध्ये आनंदी शिवला कलेक्टर साहेब या नावाने हाक मारताना दिसत होत्या. लोकप्रिय टीव्ही मालिका असलेल्या बालिका वधू या मालिकेमधील तीन पात्रे आता हयात नाहीत. सिद्धार्थ शुक्ला आणि प्रत्युषा बॅनर्जीसोबतच या मालिकेतील दादी सा ची भूमिका निभावणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचेही निधन झाले आहे.

मात्र बालिका वधू या मालिकेमधील हा भाग का व्हायरल झाला. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे सिद्धार्थच्या मृत्यूनंत लोक गुगलवर दिवंगत अभिनेत्याचा विवाह आणि कौटुंबिक माहिती शोधत आहेत. शोध घेण्यात येत असलेल्या काही लोकप्रिय विषयांमध्ये त्यांचे कुटुंब, विवाह, पत्नी आणि विवाहाची तारीख यांचा समावेश आहे. त्यामुळे हा भाग व्हायरल झाला असावा असा अंदाज मंडला जात आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news