अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya bhave) आणि मेहुल पै (Mehul Pai) गेल्या वर्षी लग्नबंधनात अडकले. मेहुल हा एका इव्हेंट कंपनीचा मालक आहे. मेहुलने सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट शेअर केली, या पोस्टमुळे दोघांच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला.
मेहुलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रुग्णालयातील फोटो (photo) पोस्ट केला. या पोस्टमधून सागितले की मी कॅन्सरशी (Cancer) झुंज देत आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत अभिज्ञासुद्धा दिसते. मेहुलने केलेली पोस्ट पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आणि तो लवकर बरा व्हावा यासाठी ते प्रार्थना करत आहेत.
मेहुलने या फोटोच्या कॅप्शन (Caption) मध्ये लिहीलं, 'माझ्या आयुष्यात मला अनेक मूर्ख भेटले, परंतु कर्करोग हा त्यापैकी सर्वांत मोठा आहे. मला माफ कर, पण तू चुकीच्या व्यक्तीला निवडलंस', असं लिहित मेहुलने रुग्णालयातील फोटो पोस्ट केला आहे.