दिग्दर्शक यांची नवीन वेब सिरीज 'स्कूप' 2 जून रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. ही वेबसिरीज प्रसिद्ध क्राईम रिपोर्टर जिग्ना व्होरा यांची आहे. जी एका वरिष्ठ क्राईम रिपोर्टरच्या हत्येप्रकरणी तब्बल नऊ महिने भायखळा तुरुंगात टाकले जाते. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा एक फोन आल्यानंतर जर्नलिस्ट जिग्ना व्होराचं आयुष्य कसं बदलतं? हे या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे.
'स्कूप' ही वेबसिरीज क्राईम रिपोर्टर 'जिग्ना व्होरा जर्नलिस्ट'च्या जीवनावर आधारित आहे. ही वेब सीरिज जिग्ना व्होरा यांनी लिहिलेल्या Behind Bars in Byculla: My Days in Prison या पुस्तकावर आधारित आहे. वरिष्ठ गुन्हे पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी गँगस्टर छोटा राजनसोबत कट रचल्याप्रकरणी जिग्ना व्होरा हिला २०११ मध्ये अटक करण्यात आली होती. हा खटला बराच काळ चालला आणि जेव्हा सर्वकाही स्पष्ट झाले तेव्हा खुनाच्या सात वर्षांनी जिग्ना व्होरा निर्दोष सुटली आणि छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा झाली.
जिग्ना व्होरा या मुंबईतील 'एशियन एज' या वृत्तपत्राच्या क्राइम रिपोर्टर होत्या. मुंबईच्या रुपारेल कॉलेजमधून तीने कायद्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर सोमय्या कॉलेजमधून डिप्लोमा केला, जिथे वेली थेवर नावाच्या प्राध्यापक आणि क्राईम रिपोर्टरने तीच्यामध्ये क्राईम रिपोर्टिंगची आवड निर्माण केली. पण तिच्या पालकांनी तिचे लग्न निश्चित केल्यामुळे तिला एका नामांकित लॉ फर्ममधील इंटर्नशिप सोडावी लागली. पण त्याचं वैवाहिक जीवन फार काळ टिकल नाही आणि मे 2004 रोजी जिग्ना तिच्या माहेरच्या घरी मुंबई घाटकोपरला येते आणि तिच्या 4 वर्षाच्या मुलाची काळजी घेत पत्रकारितेत तिची कारकीर्द करण्याचा निर्णय घेते.
जिग्ना व्होराने 2005 मध्ये तिची पहिली अंडरवर्ल्ड स्टोरी कव्हर केली, जेव्हा गँगस्टर राजनची पत्नी सुजाता निखलजे हिला बिल्डरला खंडणीच्या धमक्या दिल्याबद्दल अटक करण्यात आली होती. मिड-डेसाठी काम करत असताना, व्होरा यांनी वादग्रस्त एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्याबद्दल एक मोठी कहाणी सुरू केली ज्याने देशाला हादरवून सोडले.
2011 मध्ये जिग्ना व्होरा 'एशियन एज'च्या मुंबई ब्युरोच्या डेप्युटी ब्युरो चीफ होत्या. दरम्यान, वरिष्ठ क्राईम रिपोर्टर ज्योतिर्मय डे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असून जिग्ना व्होराचे नाव मुख्य संशयितांमध्ये आहे. अंडरवर्ल्ड गँगस्टर छोटा राजनशी संबंधित सात जणांचा एक गट म्हणून मारेकरी ओळखले जातात आणि प्राथमिक तपासात मुंबई पोलिसांनी राजन आणि व्होरा यांच्यावर हत्येचा आरोप केला आहे.
2016 मध्ये हे प्रकरण सीबीआयकडे गेले. जिग्ना व्होरा तिच्यावर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांचे खंडन करते आणि दावा करते की तिने केवळ मुलाखतीसाठी राजनशी संपर्क साधला होता. मुंबई पोलिसांनी 25 नोव्हेंबर 2011 रोजी व्होरा यांना ताब्यात घेतले. ज्योतिर्मय डे यांच्याशी संबंधित माहिती राजन यांना दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
9 महिने तुरुंगात राहिल्यानंतर 2012 मध्ये तीची मुंबईतील भायखळा कारागृहातून जामिनावर सुटका झाली. पुराव्याअभावी 2018 मध्ये विशेष महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) न्यायालयात सात वर्षांनी तीला सर्व आरोपातून मुक्त करण्यात आले.
स्कूप या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री करिश्मा तन्नानं जागृती पाठक ही भूमिका साकारली आहे. करिश्मानं या वेब सीरिजमध्ये उत्तम अभिनय केला आहे. स्कॅम 1992 या वेब सीरिजमुळे हंसल मेहता यांच्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. स्कॅम 1992 प्रमाणेच स्कूप या वेब सीरिजचे देखील हंसल मेहता यांनी उत्तम दिग्दर्शन केलं आहे.