'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही कॉमेडी टीव्ही मालिका 2008 पासून प्रसारित होत आहे. आणि अजूनही ती प्रेक्षकांच्या पसंतीस नेहमीच उतरत आहे. या टीव्ही सीरियलमध्ये जेठालाल ते बापूजी आणि बबिता जी अशी पात्रं पाहायला मिळतात जी प्रेक्षकांचं खूपच मनोरंजन करतात. आज आम्ही तुम्हाला दिलीप जोशींबद्दल सांगणार आहोत जे या टीव्ही सीरियलमध्ये जेठालालची भूमिका साकारत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार दिलीप जोशी या मालिकेच्या निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती.
बातम्यांनुसार सीरियलच्या निर्मात्यांनी जेठालालच्या भूमिकेसाठी अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र राजपाल यादवने जेठालालची भूमिका साकारण्यास नकार दिला. राजपालने असे का केले याचं उत्तर खुद्द त्याने एका मुलाखतीदरम्यान दिलं आहे. राजपालची इच्छा होती की तो साकारणार असलेली भूमिका खास त्याच्यासाठी लिहिली गेली होती. राजपाल स्वतःस दुसऱ्याने निर्माण केलेल्या विश्वास पाहत होता.
मात्र राजपाल आणि इतर काही स्टार्सने नाही म्हटल्यानंतर ही भूमिका दिलीप जोशी (Deelip Joshi) यांच्याकडे आली आणि आज दिलीप जेठालालची हीच भूमिका करून घराघरात लोकप्रिय आहेत. मात्र जेठालालची व्यक्तिरेखा साकारण्यापूर्वी दिलीप जोशी वर्षभर बेरोजगार होते. हे तुम्हाला माहीत आहे का ? खरं तर दिलीप ज्या टीव्ही मालिकेत काम करत होता ती बंद झाली होती. त्यामुळे अभिनेत्याकडे दुसरे काम नव्हते. असे म्हटले जाते की दिलीप जोशीसुद्धा एकेकाळी इतके नाराज झाले होते की त्यांना अभिनय क्षेत्र सोडावेसे वाटत होते.