मनोरंजन

“मी आणखी चांगली ‘चंद्रमुखी’ साकारली असती…” मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक दावा

Published by : Vikrant Shinde

विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी'(Chandramukhi) या कादंबरीवर आधारित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'चंद्रमुखी' हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. त्यानंतर आता हा चित्रपट चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटात दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या नृत्यांगणेची प्रमुख भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar) साकारणार आहे. तर दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे(Aadinath Kothare) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र तुम्हाला माहितीये का? या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीला विचारण्यात आले होते. तिने स्वत: याबाबतचा दावा केला आहे.
चंद्रमुखी या चित्रपटात तमाशातील शुक्राची चांदणी चंद्रा ही भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकरने साकारली आहे. मात्र या भूमिकेसाठी प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईकला(Manasi Naik) विचारणा करण्यात आली होती, असा दावा तिने केला आहे. नुकतंच ई-टाईम्सशी बोलताना तिने याबाबत सांगितले आहे.

'चंद्रमुखी या चित्रपटासाठी तुला विचारणा करण्यात आली होती का? तू ही भूमिका साकारली असतीस का?' असा प्रश्न तिला यावेळी विचारण्यात आला होता. त्यावर मानसी म्हणाली, "कदाचित मला हा चित्रपट ऑफर करण्यात आला असेल किंवा मला काय होणार याची माहिती असेल. त्यामुळे मला कदाचित त्यासाठी विचारणा करण्यात आली असावी. मी याबद्दल काहीही नाही बोललं तरच चांगलं आहे. पण माझे या संपूर्ण टीमला आशीर्वाद आहेत. त्या चित्रपटाचे लेखन करण्यापासून ते कॅमेराचे शूटींग या सर्वांसाठी मी फार खूश आहे. पण मला असे वाटतं की मी आणखी चांगली 'चंद्रमुखी' साकारली असती."

दरम्यान मानसी नाईकने केलेल्या या दाव्यावर चित्रपट निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "आम्ही 'चंद्रमुखी'साठी मानसी नाईकशी कधीही संपर्क साधला नाही, असे अक्षय बर्दापूरकर म्हणाले.

'चंद्रमुखी' हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला अजय -अतुल ( Ajay – Atul ) यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी