Varun & Janhvi Team Lokshahi
मनोरंजन

Varun Dhavan : जान्हवी कपूरला का मिळाले शाब्दीक फटकारे

जान्हवी कपूर सेटवर उशिरा पोहोचली असताना तिला दिग्दर्शकाकडून शब्दांचे फटकार खावे लागले.

Published by : prashantpawar1

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हे दोघ लवकरच 'बवाल' या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. नुकतच या दोघांनीही त्यांच्या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली. वरुण धवन आणि जान्हवी सध्या 'बवाल'च्या शूटिंगसाठी पोलंडमध्ये आहेत. दरम्यान चित्रपटाच्या सेटवरून एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये जान्हवी कपूर सेटवर उशिरा पोहोचली असताना तिला दिग्दर्शकाकडून शब्दांचे फटकार खावे लागले. त्याचवेळी वरुण धवनही जान्हवीची छेड काढताना दिसत आहे. वरुण धवनने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये वरुण धवनही जान्हवीला उशीरा येण्यासाठी चिडवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये वरुण जान्हवीचा पाय खेचताना दिसत आहे. अहेम अहेम भयंकर आहे जान्हवी. हे कसले वर्तन आहे? असं म्हणत वरून तिला चिडवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओमध्ये जान्हवी हसत हसत सगळ्यांना उशीरा आल्याबद्दल सॉरी म्हणताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये टीम कारजवळ उभी राहून तिची वाट पाहत आहे. त्याचवेळी व्हिडिओमध्ये नितेश जान्हवीला म्हणताना दिसत आहेत की जर कोणी गोंधळ निर्माण करण्याची सुरुवात चुकवली तर पात्र समजू शकणार नाही. यावर जान्हवी तिच्या कारमध्ये बसताना हसत हसत म्हणते की ती सरांना मिस करणार नाही फक्त आज. जान्हवी कपूर गाडीत बसताच वरुण म्हणाला जान्हवी कसली वागणूक आहे ही तुझी? वरुण धवनने हा व्हिडिओ स्वतः शूट केलेला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 'यंदा पंजा' हे गाणे केलं लाँच

म्हाडाचा कारभार आता होणार पेपरलेस; ई-ऑफिस प्रणाली लवकरच सुरू

Satara: जिल्ह्यात 215 जणांचे अर्ज; चुरस वाढली

राजकीय पक्षांना बंडखोरीचं ग्रहण; नाराजांकडून थेट अपक्ष अर्ज

नवी मुंबईच्या खारघरमधून 27 लाखांचं ड्रग्ज जप्त