लेखक-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (vivek agnihotri)यांनी आपल्या आगामी दिल्ली फाईल्स (Delhi files)या चित्रपटातील घोषणा केली आहे. त्यांनी या संदर्भातील माहिती ट्विट करुन सगळ्यांना दिली. त्यांचा नुकताच द काश्मीर फाइल्स हा चित्रपट प्रदर्शित होऊन गेला. या चित्रपटाने जवळजवळ 300 कोटींचा पार बॉक्स ऑफिसवर कमाई केली. हा चित्रपट काश्मीर मध्ये हिंदू पंडित यांचे झालेले पलायण या विषयावर आधारित होता.
या आपल्या 'द दिल्ली फाईल्स' या आगामी सिनेमाविषयी एका पोस्टच्या माध्यमातून विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीटरवरनं माहिती दिली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी स्वतःचा फोटो शेअर करीत लिहिलं आहे की,''मी माझ्या 'द काश्मिर फाईल्स' सिनेमावर ज्यांनी-ज्यांनी प्रेम केलं त्या सर्वांचा आभारी आहे. मी खूप प्रामाणिकपणे 'द काश्मिर फाईल्स' सिनेमावर गेली चार वर्ष कष्ट घेतले होते. मी कदाचित तुम्हाला खुप मागे घेऊन गेलो. भूतकाळाच्या जखमा पुन्हा जागवल्या पण काश्मिरी पंडितांसोबत जे घडलं होतं. त्यावेळी त्या अत्याचाराविषयी जाणून घेण्याचा हक्क एक भारतीय म्हणून प्रत्येकाला होता. आता वेळ आहे आणखी एक नवं सत्य समोर आणण्याची. माझ्या नव्या सिनेमावर काम करण्याची''. ट्वीटरवरील त्या पोस्टच्या माध्यमातून 'द दिल्ली फाईल्स' हे नव्या सिनेमाचं नाव त्यांनी सूचित केलं आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी 'द काश्मिर फाईल्स' सिनेमापूर्वी 'द ताश्कंद फाईल्स' हा सिनेमा बनवला होता. जो पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या 1966 साली झालेल्या रहस्यमय निधनावर भाष्य करणारा होता. आता 'दिल्ली फाईल्स' मध्ये नेमकं कोणतं सत्य जगासमोर आणणार आहेत विवेक अग्निहोत्री याचीच चर्चा रंगली.