दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाचा लाइगर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी विजय देवरकोंडाने बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खानविषयी एक वक्तव्य केलं आहे.

विजय देवरकोंडा म्हणाला की, “मला शाहरुखने माझ्या स्वप्नांच्या मागे धावण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. जर तो ते करु शकत असेल तर मी का नाही? असा प्रश्न मी स्वत:ला केला होता. शाहरुखच्या एका विधानामळे मला खूप प्रेरणा मिळाली होती. मला माझे जुने दिवस आठवले. यात शाहरुख स्वत:ला शेवटचा सुपरस्टार म्हणाला होता.” यासोबतच तो म्हणाला की, मी एकदा त्याची मुलाखत बघत होतो तेव्हा शाहरुख म्हणाला, “मी सर्वात शेवटचा सुपरस्टार आहे. त्यावेळी मी माझ्या मनात असे बोलत होतो की शाहरुख तू चुकीचा आहेस. तू शेवटचा सुपरस्टार नाही. मी लवकरच येतोय, असे मी म्हटले होते. यानंतरच मी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले.” तसेच “शाहरुख खानला मी प्रेरणास्थान मानतो. जर तो सिनेसृष्टीतील कोणत्याही पार्श्वभूमीशिवाय इथपर्यंत पोहोचू शकतो तर मी ही ते करु शकतो. त्यामुळे शाहरुख हा शेवटचा सुपरस्टार नाही, मी देखील याच रांगेत उभा आहे”, असे विजय म्हणाला. अर्जुन रेड्डी’, ‘गीता गोविंदम’, ‘डिअर कॉमरेड’ यासारख्या हिट चित्रपटांमध्ये विजय देवरकोंडाने काम केलं आहे.