सुंदर त्वच्या ही प्रत्येकालाच हवी असते आणि त्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे उपाय करत असतात. मात्र यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे घरगुती उपाय. त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी डाळिंब हे खूप उपयोगी ठरते डाळिंब हे लोहयुक्त आहे. त्यातले पोषक घटक आपले हिमोग्लोबिन वाढवतात, ज्यामुळे तुमच्या त्वचेला चमक येते. डाळिंबामध्ये पाण्याचा चांगला स्रोत आहे. हे त्वचेला चमकदार बनवतात.
मुरुम, ब्लॅकहेड्स, व्हाइटहेड्स पासून मुक्त होण्यास डाळिंबाची मदत होते. सर्वांना सुंदर ओठ हवे असतात, मात्र पोषक घटकांच्या अभावामुळे ओठ कोरडे होतात. जर तुम्हाला ओठ गुलाबी आणि सुंदर ठेवायचे असतील तर त्यावर डाळिंबाचा रस हा उत्तम आहे. रोज डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्याने ओठ गुलाबी आणि सुंदर राहतात. डाळिंब तुमच्या रक्तवाहिन्या तसेच तुमच्या त्वचेच्या पेशींना मोठ्या प्रमाणात मिनरल्स पुरवतो.