urfi javed Team Lokshahi
मनोरंजन

धक्कादायक! थेट उर्फीची काढली तरूणांनी छेड; पाहा संपूर्ण प्रकरण

Published by : shweta walge

अतरंगी फॅशन आणि बेधडक वक्तव्यामुळे उर्फी नेहमीच चर्चेत असते. तिच्या नवनव्या कपड्यांच्या स्टाइलने ती लोकांना आश्चर्याचा धक्का देत असते. पण आता उर्फी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  काही तरूणांनी विमानात उर्फीची छेड काढण्याचा प्रयत्न केलाची माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर शेअर करत उर्फीने स्वत: ही माहिती दिली आहे.

उर्फी जावेदची पोस्ट

काल मुंबईहून गोव्याला फ्लाईटमधून जात असताना मला छेडछाडीचा सामना करावा लागला. या व्हिडीओत दिसणारे जे पुरूष आहेत, ते घाणरेडं बोलत होते. छेड काढत होते आणि (माझं) नाव घेत होते. मी त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असतात, त्यापैकी एकाने सांगितलं की मित्र नशेत आहेत. मद्यपान करणं किंवा नशेत असणं ही काही महिलांची छेड काढण्याची सबब असू शकत नाही. मी पब्लिक फिगर आहे, पब्लिक प्रॉपर्टी नव्हे ‘ अशा शब्दांत उर्फीने तिचा भयानक अनुभव शेअर करत महिलांची छेड काढणाऱ्यांना फटकारले आहे.

दरम्यान, उर्फी ही इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करत होती, तेथेच या मुलांचा एक ग्रुपही होता. मी पब्लिक फिगर आहे, याचा अर्थ मी सार्वजनिक मालमत्ता आहे, असा होत नाही, असेही तिने नमूद केले.

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम

IND vs BAN 1st Test: पहिल्या दिवसाचा खेळ अश्विन आणि जडेजाच्या नावावर

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने