उर्फी जावेद अनेकदा तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि आउटफिट्ससाठी चर्चेत असते. आपल्या कपड्यांमुळे चर्चेत असलेली ही अभिनेत्री आता नव्या अडचणीत सापडली आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही उर्फीचा ड्रेस तिच्यासाठी अडचणीचा ठरला आहे. वास्तविक, उर्फीविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उर्फीवर सार्वजनिक ठिकाणी आणि सोशल मीडियावर अश्लीलता पसरवल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर ती बेकायदेशीर कामेही करते, असेही तक्रारीत म्हटले आहे.
उर्फीविरोधात मुंबईतील अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकील अली काशिफ खान देशमुख यांनी शुक्रवार, 9 डिसेंबर रोजी पोलिसांकडे लेखी अर्ज सादर केला होता. पोलिसांनी रविवारी, 11 डिसेंबर रोजी तक्रार नोंदवली आहे. अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
याआधीही पोलिसांनी उर्फी जावेदवर गुन्हा दाखल केला होता. खरे तर एका व्यक्तीने उर्फीविरोधात दिल्लीच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावेळीही उर्फीवर अश्लीलता पसरवल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच, 'हे है ये मजबूरी' या म्युझिक व्हिडिओमुळे उर्फी कायदेशीर अडचणीत सापडली आहे. उर्फीवर गाण्यात रिव्हिलिंग ड्रेस घातल्याचा आरोप होता.
'बिग बॉस ओटीटी' फेम उर्फी जावेद तिच्या अनोख्या फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. उर्फीचे पोशाख अनेकदा लोकांचे लक्ष वेधून घेतात. दोरी, वायर, चेन, फ्लॉवर, सिमकार्ड किंवा तुटलेल्या काचांनी ती तिच्या ड्रेसवर प्रयोग करत राहते. सोशल मीडिया यूजर्सकडून उर्फीला खूप ट्रोल देखील केले जाते. उर्फीने अनेकदा सांगितले आहे की तिला ट्रोल व्हायला हरकत नाही.