फॅशन सेन्समुळे चर्चेत असलेली उर्फी जावेद सतत वादात असते. ज्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तीचे कपडे आणि दुसरे म्हणजे तीची स्पष्टवक्ते शैली. आता उर्फीचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे, ज्यामुळे उर्फीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पण ही अटक का आणि कोणत्या गुन्ह्यात करण्यात आली आहे हे अद्यापही अस्पष्ट आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये उर्फी एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या दोन महिला पोलिस येतात आणि उर्फीला त्यांच्यासोबत येण्यास सांगतात. यावर उर्फीला कारण विचारात पडते आणि रेस्टॉरंटबाहेर महिला पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. जेव्हा उर्फीने त्यांना ताब्यात घेण्याचे कारण विचारले तेव्हा महिला पोलिसाने उत्तर दिले, "इतके छोटे कपडे घालून कोण फिरते?"