मनोरंजन

जाणून घ्या, OTT प्लॅटफॉर्मवर येणारे आगामी चित्रपट…

Published by : Lokshahi News

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मनोरंजनसृष्टी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेत आहे. मोठ्या बजेटपासून ते छोट्या बजेटपर्यंतच्या (budget) चित्रपट नेटफ्लिक्स (Netflix), अमेझॉन प्राइम व्हिडिओ (Amazon Prime Video) आणि हॉटस्टार (Disney Plus Hotstar)सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आघाडीवर आहेत. जरी अनेक देश चित्रपटगृहांवरील निर्बंध हळूहळू शिथिल करत असले तरी अजूनही पुढील महिन्यात, अनेक चित्रपट ओटीटी रिलिज होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.भारतातील ओटीटी प्लॅटफॉर्मवर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अनेक चित्रपट रिलीज होणार आहेत.

जाणून घ्या, कोणता चित्रपट कोणत्या दिवशी ओटीटी (OTT) वर प्रदर्शित होणार आहेत –

हेल्मेट (Helmet)
प्रणूत बहल (pranut bhal), अपारशक्ती खुराना (aparshakti khurana), आशिष वर्मा (aashishVarma), आणि इतर कलाकारांच्या अभिनयाने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट कंडोमने (condom) भरलेल्या ट्रकवर तीन मित्रांनी केलेल्या लुटमारीची विनोदी कथा आहे. अशा परिस्थितीत कंडोम विकणे आणि त्यातून व्यवसाय करण्याची कल्पना प्रदर्शित केली आहे. हा चित्रपट ३ सप्टेंबरला झी (ZEE5) वर प्रदर्शित होणार आहे.

ब्लॅक विडो (Black widow)
बहुप्रतिक्षित मार्वल चित्रपटांपैकी एक, स्कार्लेट जॉन्सनच्या (Scarlett Johansson)ब्लॅक विडो (Black widow)चाहते भारतात रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. अॅक्शन स्पाय थ्रिलर भारतात डिस्ने प्लसवर (Disney Plus Hotstar) ३ सप्टेंबरला रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडसह अनेक प्रादेशिक भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट नताशा रोमनॉफ (Natasha Romanoff) उर्फ ​​ब्लॅक विडो भूतकाळाच्या कथेवर केंद्रित असेल.

सिंड्रेला (Cinderella)
कॅमिला कॅबेलोचा (Camila Cabello) सिंड्रेला हा आणखी एक बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. जो 3 सप्टेंबर रोजी Amazonअमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज होईल. हा चित्रपट आधुनिक काळातील सिंड्रेला कॅमिला कॅबेलोने साकारलेला आणि तिच्या महत्त्वाकांक्षेला प्राधान्य देण्याच्या प्रवासाचे अनुसरण करतो. या चित्रपटात इदिना मेंझेल, (Idina Menzel) मिनी ड्रायव्हर (Minnie Driver), निकोलस गॅलिट्झिन (Nicholas Galitzine), बिली पोर्टर (Billy Porter), आणि पियर्स ब्रॉस्नन (Pierce Brosnan)सारखे कलाकारही दिसतील.

मनी हाइस्ट (Money Heist)
बहुप्रतिक्षित थ्रिलर (thriller) मालिका मनी हेस्ट सीझन 5 सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रीमियरसाठी सज्ज आहे. ला कासा डी पॅपेलचा (La Casa de Papel) अंतिम अभिनय नेटफ्लिक्सवर पाच भागांसह प्रदर्शित केला जाईल.तर उर्वरित पाच भाग डिसेंबर 3 ला रिलीज होईल. सीझन 5 मध्ये अनेक कलाकार दिसतील, जसे अल्वारो मोर्टे (Álvaro Morte), उर्सुला कॉर्बेरो (Úrsula Corberó), इत्झियार इटुनो (Itziar Ituño), जैमी लॉरेन्टे (jaime lorente), आणि एस्तेर एसेबो (Esther Acebo)

शांग-ची (Shang-Chi and the Legend of the Ten Rings)

मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा (marvel cinematic universe) पहिला एशियन सुपरहिरो, शांग-ची आणि द लीजेंड ऑफ द टेन रिंग्ज डिस्ने प्लसवर 3 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये उपलब्ध होईल. या चित्रपटात सिमू लियू (Simu Liu), अक्वाफिना (Awkwafina), टोनी लेउंग चिउवाई (Tony Leung Chiu‑wai) आणि फाला चेन (Fala Chen) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Women's T20 WC 2024: आयसीसीने T20 विश्वचषकासाठी स्पेशल थीम सॉन्ग केले लॉन्च

Sharad Pawar: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; शरद पवारांचं ट्विट करत सवाल...

Chitra Wagh: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

Amol Mitkari: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Varsha Gaikwad: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया