Timepass 3 Team Lokshahi
मनोरंजन

‘टाइमपास 3’ आज 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘टाइमपास’ सिनेमाला कायमच प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. पहिल्या दोन सिनेमांच्या यशानंतर दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘टाइमपास 3' सिनेमालाही प्रेक्षकांनी चांगलीच पसंती मिळाली आहे.

Published by : shamal ghanekar

दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘टाइमपास 3’ सिनेमाला कायमच प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. पहिल्या दोन सिनेमांच्या यशानंतर दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘टाइमपास 3' सिनेमालाही प्रेक्षकांनी चांगलीच पसंती मिळाली आहे. ‘टाइमपास 3' ला मिळालेल्या यशानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. टाइमपास 3 हा सिनेमा ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणार आहे.

‘टाइमपास 3' सिनेमात प्रथमेश परब आणि हृता दुर्गुळे यांची मुख्य भूमिका आहे. दगडू म्हणजेच प्रथमेश परब हा 36 टक्के मिळवून बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर कॉलेजमध्ये येतो आणि त्यानंतर पुढे काय होणार ते आपण या सिनेमात पाहाणार आहोत. तर या सिनेमात गँगस्टरची मुलगी पालवीची भुमिका हृता दुर्गुळे साकारत आहे. या सिनेमामध्ये दगडूच्या सुसंस्कृत वागण्यानं पालवी प्रभावित होते. तर या चित्रपटामधील या दोघांची लव्ह स्टोरी आणि केमेस्ट्री पाहायला खूप मजा येणार आहे.

‘टाइमपास 3’ या सिनेमामध्ये संजय नार्वेकर, भाऊ कदम, वैभव मांगले हे सर्व कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. ‘टाइमपास 3’ रोमान्स आणि हास्याने भरलेला आहे. ‘टाइमपास 3’ हा सिनेमा 16 सप्टेंबरला ZEE5या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शक रवी जाधव यांनी सिनेमाविषयी बोलताना सांगितले की, जेव्हा आम्ही सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात केली तेव्हा कोविड-19 काळ होता आणि केव्हाही लॉकडाउन होण्याची शक्यता जास्त होती. तेव्हा कोविड-19 केसेस जास्त होत्या. आम्ही ‘टाइमपास 3' सिनेमाला जानेवारी- फेब्रुवारी 2021 मध्ये शूटिंगला सुरुवात केली आणि मार्च 2021 मध्ये शूटिंग पूर्ण झालं. तेव्हा सगळ्यांना मास्क बंधनकारक होत आणि मेक- अप टीमही कायम त्यांच्या किटमध्ये असायचे. त्यावेळी शुटींग करणं खूप अवघड होत आणि फक्त 50 जणांबरोबरच शूटिंग करता यायचं. जर शुटींग करताना संख्या वाढली तर पोलिस यायचे. कोविड-19 चे नियम पालन हे आमच्यापुढचं खूप मोठं आव्हान होतं आणि यावेळी प्रत्येकाने सहकार्य केलं.’ असे त्यांनी सांगितले.

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु