मनोरंजन

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील हा सीन होतोय viral

Published by : Lokshahi News

छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' ही मालिके लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेचा विषय, दर्जेदार लिखाण, उत्तम दिग्दर्शन आणि या सर्वाला न्याय देणारा कलाकारांचा कसदार अभिनय यामुळेच या मालिकेने प्रत्येकाच्या मनात घर केलं आहे.

सध्या मालिकेत यश आणि गौरीच्या साखरपुड्याचा ट्रॅक पाहायला मिळतो आहे. मात्र साखरपुड्याच्या दिवशी गौरीने आपण आई होऊ शकत नाही हे सत्य सर्वांना सांगितलं आणि आईपणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला.

आई होणं एवढ्यातच स्त्रीचं स्त्रीत्व आहे का या विषयावर भाष्य करणारा हा प्रसंग मालिकेत सलग तीन दिवस चालला. ३१ पानांची संहिता असलेला हा प्रसंग कलाकारांनी जीव ओतून सादर केला. त्यामुळेच या खास भागाचं सर्वांकडून कौतुक होत आहे.

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती