डॉ. एमएस स्वामीनाथन यांनी आपल्या देशाच्या कृषी आणि शेतकरी कल्याणात अतुलनीय योगदान दिले आहे. याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न प्रदान करणे ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचे पंतप्रधान म्हणाले. स्वामीनाथन यांनी आव्हानात्मक काळात भारताला कृषी क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी मदत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणासाठी उत्कृष्ट प्रयत्न केले.
पीएम मोदी म्हणाले की, ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असोत किंवा देशाचे गृहमंत्री असोत आणि आमदार म्हणूनही चौधरी चरणसिंग यांनी नेहमीच राष्ट्र उभारणीला चालना दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. आपल्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती त्यांनी केलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करणे हे आमचे सौभाग्य असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
आपले माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे हे सांगताना आनंद होत आहे. एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी म्हणून, नरसिंह राव यांनी विविध पदांवर भारताची मोठ्या प्रमाणावर सेवा केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, तसेच अनेक वर्षे संसद आणि विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी केलेल्या कार्यासाठी ते तितकेच स्मरणात आहेत.