मनोरंजन

Fukrey 3 Trailer: ‘फुकरे ३’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Fukrey 3 Trailer Release: फुकरे-3 चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

Published by : Team Lokshahi

Fukrey 3: यावेळी फुकरे चित्रपटात चूचा, हनी आणि लाली देणार भोली पंजाबनला टक्कर. खळखळून हसायला लावणारा 'फुकरे ३'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'फुकरे.' या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता या चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजेच 'फुकरे ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ट्रेलरमध्ये कलाकारांचा विनोदी अंदाज बघायला मिळत आहे. फुकरे 2013 मध्ये रिलीज झाला. त्यानंतर 2017 मध्ये फुकरे रिटर्न्स रिलीज झाला. आता फुकरे -3 चित्रपट 28 सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे. 'फुकरे 3' या चित्रपटात पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मंजोत सिंह, पंकज त्रिपाठी आणि ऋचा चड्ढा हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. 'फुकरे 3' या चित्रपटाचे दिग्दर्शन धुरा मृगदीप लांबा यांनी केले आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी 'फुकरे 3' या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

'फुकरे 3' या चित्रपटातील कलाकारांचे कॉमिक टाइमिंग पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 'फुकरे 3'चित्रपटाच्या ट्रेलरला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी या ट्रेलरचं कौतुक केलं आहे.

'फुकरे ३' चित्रपटाच्या २ मिनिटे ५१ सेकंदाच्या ट्रेलरची सुरुवात ही अभिनेता पुलकित सम्राट आणि वरुण शर्माने होते. दोघेही एका नगरपालिकेच्या शाळेतील फेरवेल पार्टीमध्ये भाषण देत असतात. त्यांचे भाषण ऐकून सर्वांनाच हसू अनावर होते. थोड्या वेळाने अभिनेत्री ऋचा चड्ढा म्हणजे भोली पंजाबनची एण्ट्री होते. तिच्या एण्ट्रीनंतर हंगामा झाल्याचे पाहायला मिळते. यावेळी ती निवडणूक लढवण्याचे ठरवते. तिच्या विरोधात तीन फुकरे उतरतात. एकंदरीत चित्रपटाचा ट्रेलर पाहाताना सर्वांनाच हसू अनावर होणार आहे. फुकरे चित्रपटात भोली पंजाबन तुरुंगात गेली असते. फुकरे रिटर्न्समध्ये ती या तिघांचा बदला घेण्याचे ठरवते. आता फुकरे ३ मध्ये ती चूचा, हनी आणि लाली यांच्या विरोधात निवडणूक लढण्याचा निर्णय घेते. मृगदीप सिंह लांबा दिग्दर्शित फुकरे ३ हा चित्रपट २८ सप्टेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का