मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत आणि हे चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतात. अशाच एक ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe ) यांनी नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली. ‘गरुडझेप’ (Shivpratap Garudjhep Teaser )असं या चित्रपटाचं नाव आहे. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी त्याच्या सोशल मीडियावर हा टीझर शेअर केला होता.
नुकतेच या चित्रपटातील ‘बम बम भोले’ (Bam Bam Bhole Song) हे शिवशंकर आराधनेचे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गाण्याची शब्दरचना गीतकार ऋषीकेश परांजपे यांची असून संगीत शशांक पोवार यांचे आहे. दीपाली विचारे यांचे नृत्यदिग्दर्शन आहे तर छायांकन संजय जाधव यांचे आहे. ‘महाराजांनी प्रत्येकामध्ये आत्मविश्वास आणि चेतना जागवली. हे गाणंही तसंच असून प्रत्येकाला या गाण्यातून प्रेरणा मिळेल, असे अभिनेते अमोल कोल्हे यांनी सांगितले. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
जगदंब क्रिएशन्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती स्वतः अमोल कोल्हे यांनीच केली आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. सप्टेंबर २०२२मध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.“३५६ वर्षांपूर्वी हाच आग्र्याचा लाल किल्ला थरारला होता. मुघलशाही हादरली होती. कारण याच वास्तूमध्ये पेटलं होतं मराठी स्वाभिमानाचं स्फुलिंग. पूर्ण हिंदुस्तानानं अनुभवला होता हा शिवप्रताप”