मनोरंजन

टीआरपीच्या स्पर्धेत ‘ही’ मालिका ठरली अव्वल, तर आई कुठे काय करते, देवमाणूस पिछाडीवर

Published by : Lokshahi News

चित्रपट असो किंवा मालिका प्रेक्षकचं त्यांचं भवितव्य ठरवत असतात. काही मालिका प्रेक्षकांना भावतात तर काही मालिकांकडे प्रेक्षक पाठ फिरवतात. मालिकांसाठी टीआरपी खूप महत्वाचा असतो. सध्या टीआरपीच्या स्पर्धेत स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका बाजी मारत आहेत. 

सर्वात चर्चेत असलेली मालिका 'मुलगी झाली हो' मागच्या दोन आठवड्यांप्रमाणे याही आठवड्यात पाचव्या स्थानवर आहे. तसंच मागच्या आठवड्याप्रमाणे यावेळेसही पहिल्या क्रमांकावर स्टार प्रवाहवरली 'रंग माझा वेगळा' ही मालिका आहे. मालिकेत लग्नाचा ट्रॅक सुरू असूनही 'आई कुठे काय करते' ही मालिका दुसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरली आहे. तर दुसरं स्थान 'धुमधडाका २०२२' ने पटकावल आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका आहे.

या आठवड्यात सहाव्या स्थानावर आहे 'फुलाला सुगंध मातीचा ' मालिका तर सातव्या स्थानावर झी मराठी ची ' माझी तुझी रेशीमगाठ' आणि आठव्या स्थानावर आहे स्टार प्रवाह वरील मालिका ' ठिपक्यांची रांगोळी '

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही नवव्या स्थानावरून दहाव्या स्थानावर आली आहे. तर तिची जागा 'स्वाभिमान:शोधअस्तित्वाचा' या मालिकेने घतली आली आहे. 'सहकुटुंब सहपरिवार' आणि 'देवमाणूस' या वेळीस टॉप १० मालिकांच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी