अभिनेत्री विद्या बालनने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. विद्या बालनचा कोणताही चित्रपट अलिकडच्या काळात चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला नाही. मात्र तिचा ‘द डर्टी पिक्चर’ हा चित्रपट जबरदस्त चर्चेत आला. या चित्रपटात विद्या बालनसोबत नसीरुद्दीन शाह आणि इमरान हाश्मी हे कलाकार देखिल होते. २०११ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
आता ‘द डर्टी पिक्चर’च्या सिक्वेलची चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘द डर्टी पिक्चर’च्या सिक्वेलवर काम सुरू झाले आहे, या चित्रपटासाठी विद्या बालनला विचारणा करण्यात आलेली नाही असे समजते तर यासाठी या चित्रपटाबाबत विद्या बालनच्या जागी क्रिती सेनॉन किंवा तापसी पन्नूलाही विचारण्यात येण्याची शक्यता आहे. बालाजी मोशन पिक्चर्स आणि एकता कपूर या चित्रपटाबाबत खूप उत्सुक आहेत. २०२३ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचीही चर्चा आहे.
द डर्टी पिक्चरच्या सिक्वेलच्या स्क्रिप्टवर काम सुरू झाल्याचीही चर्चा आहे. मात्र अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही आहे.