Jhund Team Lokshahi
मनोरंजन

झुंड लवकरच येणार ओटीटीवर!

Published by : Akash Kukade

प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता नागराज मंजुळेच्या (Nagraj Manjule) झुंड या चित्रपटाबद्दल बरीचशी चर्चा झाली. या चित्रपटची पावनखिंड या चित्रपटाशी जोडून तुलनात्मक बाबीवर चर्चा झाल्यात. तसेच सोशल मीडियावरही झुंडची बरीच चर्चा झाली.

जाणकारांनी या चित्रपटास उत्तम दादही दिली आहे. काहींनी तर झुंड विषयी सोशल मीडियावर लिखाणही केले. बॉलीवूडमध्ये पदार्पण करताना नागराजने पहिलाच चित्रपट झुंड हा महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत केला. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा प्रभावी ठरला नाही. त्याला मोठी कमाई करता आली नाही. त्यामुळे बॉक्स ऑफिसच्या भाषेत सांगायचे झाल्यास तो फ्लॉप झाल्याचे दिसुन आले. त्या दरम्यान मराठीमध्ये दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित पावनखिंड, संजय भन्साळी दिग्दर्शित गंगुबाई काठियावाडी, साऊथचा वल्लीमाई यासारखे चित्रपट प्रदर्शित झाले होते.

आता प्रेक्षकांसाठी आनंदाची बाब म्हणजे झुंड हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्याची घोषणा करण्यात आली आहे. झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण देणाऱ्या विजय बारसे यांच्या आयुष्यावरील या चित्रपटामध्ये गरीबी, त्यात वाढलेल्या मुलांचा संघर्ष. त्यांना पडणारे प्रश्न याविषयी प्रभावी भाष्य करण्यात आले आहे.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेला झुंड हा झी 5 (zee 5) या ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्या ओटीटी प्रिमिअर विषयी नागराजनं सांगितलं की, झुंड ही प्रवाहाच्या विरोधात संघर्ष करणाऱ्यांची कथा आहे. प्रेक्षकांना विचार प्रवृत्त करणारा हा चित्रपट आपल्याला खूप काही गोष्टी शिकवून जातो. समाजातील अनेक वाईट प्रवृत्तींवर सडेतोडपणे भाष्य करणारा हा चित्रपट हा आता ओटीटीवर येतो आहे. याचा आनंद वाटतो. 6 मे रोजी झुंड हा ओटीटीवर पाहता येणार आहे.

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम

IND vs BAN 1st Test: पहिल्या दिवसाचा खेळ अश्विन आणि जडेजाच्या नावावर

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने