छोट्या पडद्यावरच लोकप्रिय, परंतु नेहमीच वादग्रस्त ठरलेला ‘बिग बॉस’चा यंदाचा सीझन म्हणजेच ‘बिग बॉस 17’ आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘बिग बॉस 17’चा महाअंतिम सोहळा पार पडणार असून, त्याची तयारी देखील सुरू झाली आहे. या घरात एकूण 21 स्पर्धक सामील झाले होते. यापैकी आता केवळ 5 स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. याच पाच स्पर्धकांमध्ये विजेतेपदाची चुरस रंगणार आहे. आता ‘बिग बॉस 17’चा ग्रँड फिनाले कधी आणि कुठे पाहता येणार?
'बिग बॉस 17चा ग्रँड फिनाले'ची तारीख आणि वेळ जाहीर झाली आहे. सलमान खानने होस्ट केलेल्या शोचा ग्रँड फिनाले 28 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच रविवारी संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजेच जवळपास सहा तासांचा हा ग्रँड फिनाले असेल. कलर्स टीव्हीशिवाय तुम्ही हा शो तुमच्या फोनवर ऑनलाइनसुद्धा पाहू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये जियो सिनेमाचा अॅप डाऊनलोड करावा लागेल. त्यावर तुम्ही ‘बिग बॉस 17’ लाइव्हवर क्लिक करून या सिझनचा ग्रँड फिनाले पाहू शकता. हा शो तुम्हाला मोफत लाइव्ह पाहता येणार आहे.
मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा आणि अरुण महाशेट्टी यांच्यापैकी ‘बिग बॉस 17’ ची ट्रॉफी आणि बक्षिसाची रक्कम कोण पटकावेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रश्नाचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘बिग बॉस 17’चा ग्रँड फिनाले रविवारी प्रसारित होणार आहे.
बिग बॉस 17 जिंकणाऱ्या सदस्याला 50 लाख रुपये इतकी रोख रक्कम मिळणार आहे. तसेच विजेत्याला एक क्रेटा कार देखील मिळणार आहे. तर उपविजेत्याला 30 ते 35 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळतील. अंकिता लोखंडे, मुनावर फारुकी , मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण माहशेट्टी या 5 जणांपैकी अंकिता आणि मन्नाराला सपोर्ट करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. दोघींचे चाहते त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सपोर्टसाठी अपील करत आहेत. नुकताच अंकिताचा नवरा विकी जैन बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला, त्याबद्दल काहींनी दुःख व्यक्त केले आहे.