मनोरंजन

'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर’ चित्रपटातील पहिले गाणं भेटीला

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि मृद्गंध फिल्म्स एल. एल. पी. निर्मित 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर’ या चित्रपटातील पहिले 'साला कॅरेक्टर' हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि मृद्गंध फिल्म्स एल. एल. पी. निर्मित 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर’ या चित्रपटातील पहिले 'साला कॅरेक्टर' हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. शाल्मली खोलगडेच्या जबरदस्त आवाजात गायलेल्या या गाण्याला वैभव जोशी यांनी शब्दबद्ध केले असून अजित परब यांचे अफलातून संगीत लाभले आहे. मस्तीने भरलेल्या या गाण्यात 'चाळीशी'तील मित्रमैत्रिणींचे गेटटूगेदर दिसत आहे. सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे अतिशय धमाल आहे.

चाळीशी हा आयुष्यातला असा गंमतशीर टप्पा आहे, जिथे तुम्ही तरुणही नसता आणि प्रौढही. त्यामुळे या वयातील धमाल ही विशेष वेगळी असते. ही धमाल, मजामस्ती या गाण्यात दाखवण्यात आली आहे. विवेक बेळे लिखित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर, संदीप देशपांडे निर्माते आहेत. हे 'चाळीशी'तील चोर येत्या २९ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

गाण्याबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, '' 'साला कॅरेक्टर' हे गाणं करताना ते सर्व वयोगटातल्या लोकांना सहज गुणगुणता यावं आणि नाचता यावं असा विचार होता ज्याला अजित परब आणि वैभव जोशी या दोन्ही अवलियांनी पुरेपूर न्याय दिला आहे.गाण्यावरून चित्रपटात काय धमाल येईल, याचा अंदाज तुम्ही बांधूच शकता.''

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...