मनोरंजन

'जवान'चे दिग्दर्शक अ‍ॅटलीने दिली गोड बातमी; लग्नाच्या आठ वर्षानंतर येणार नवा पाहुणा

चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी दिग्दर्शकाने पत्नी कृष्णा प्रियासोबत एक मोठी आणि अतिशय खास घोषणा केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

भारतीय चित्रपट निर्माते अ‍ॅटली यांचे चाहते नेहमीच त्यांच्या चित्रपटांबद्दल उत्सुक असतात. आता, त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी दिग्दर्शकाने पत्नी कृष्णा प्रियासोबत एक मोठी आणि अतिशय खास घोषणा केली आहे. अ‍ॅटलीची पत्नी कृष्णा प्रियाने सोशल मीडियावर काही हृदयस्पर्शी छायाचित्रांसह तिच्या गरोदरपणाची घोषणा केली आहे.

लग्नाच्या 8 वर्षानंतर या जोडप्याने त्यांच्या आयुष्यातील हा आनंद शेअर केला. त्यांनी कॅप्शनमध्ये म्हंटले की, आम्ही तुमच्या सर्वांचे प्रेम आणि समर्थनासाठी कृतज्ञ आहोत आणि तुम्ही आमच्या येणाऱ्या नव्या पाहुण्यावर अशाच प्रेमाचा वर्षाव करत रहावे अशी आमची इच्छा आहे. आम्ही गरोदर आहोत हे जाहीर करताना आनंद होत आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आणि प्रेमाची गरज आहे. विथ लव अ‍ॅटली आणि प्रिया, असे त्यांनी लिहीले आहे.

अनेक वर्षांच्या प्रेमानंतर अ‍ॅटली यांनी 2014 मध्ये अभिनेत्री कृष्णा प्रियासोबत लग्न केले. तसेच, "ए फॉर अ‍ॅपल प्रॉडक्शन" हे प्रोडक्शन हाऊस सुरू करून या बॅनरखाली दोन चित्रपटांची यशस्वी निर्मिती देखील केली. आता लग्नाच्या 8 वर्षांनंतर, अ‍ॅटली आणि प्रिया त्यांच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करण्यासाठी सज्ज आहेत. अशातच, अ‍ॅटली आणि प्रियाने अनेक इमोशन्ससह आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.

अ‍ॅटली एक भारतीय चित्रपट निर्माता आहे. ज्यांनी दक्षिण भारतीय कमर्शियल सिनेमाचा चेहरा बदलत इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक बनला. तसेच, 2019 मधील सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट, 'बिगिल 'सह भारतातील सर्वात मोठा चित्रपट निर्माता बनण्यासाठी त्याने सर्व अडचणींवर मात केली. अ‍ॅटली यांचा पहिला बॉलीवुड प्रोजेक्ट जो भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असेल जवान चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. अशातच, या चित्रपटात भारतीय सुपरस्टार आणि बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान यांचा समावेश आहे.

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव