मनोरंजन

'सीता रामम'चे संवाद लिहिलेत 'या' मराठी अभिनेत्रीने

काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सीता रामम चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. मुळात हा चित्रपट तेलुगू होता. या चित्रपटाला हिंदी भाषेतदेखील डब केले होते.

Published by : Team Lokshahi

काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सीता रामम चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मुळात हा चित्रपट तेलुगू होता. या सिनेमाचे हिंदी वर्जन सुद्धा खूप गाजला आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटाचा हिंदी संवाद मराठमोळ्या अभिनेत्रीने लिहिला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बिग बॉस मराठी सीजन २ मधील नेहा शितोळे आहे.

एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीदरम्यान नेहाने याचा खुलासा केला आहे. नेहा म्हणाली, 'मधल्या काळात मी लिखाणाचे खूप काम केले होते. पण सर्वांनाच माहित आहे असे ते काम नाही. म्हणजे ‘सीता रामम्’ नावाचा एक तेलुगू चित्रपट आहे. त्यात दुलकर सलमान आणि मृणाल ठाकूर हे दोघेजण या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे पूर्ण हिंदी संवाद मी लिहिले आहे.

हा चित्रपट अतिशय रोमँटिक, काव्यात्मक आहे आणि त्या चित्रपटातील संवादही तसेच असायला पाहिजे. पुढच्या ५ दिवसांत आम्ही तो चित्रपट दिवस-रात्र लिहून पूर्ण केला होता, असेही नेहा शितोळेने सांगितले.

सीता रामम् ही एक लोकप्रिय लव्हस्टोरी आहे. सिनेमात दुलकर सलमानने सैनिकाची भूमिका साकरली आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूरने श्रीमंत असलेल्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे. ती श्रीमंत असूनही तिच्यामध्ये जरादेखील गर्वपणा नसतो.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट