आज म्हणजे शुक्रवारी (22 जुलैला) एक मेगा इव्हेंट (Mega Event) सुरू होणार आहे. हा मेगा इव्हेंट दुपारी 4 वाजल्यापासून सुरूवात झाली. हा कोणताही सामान्य कार्यक्रम नसून हा 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये चित्रपट आणि कलाकारांना गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यामध्ये कलाकारांच्या उत्कृष्ट कामासाठी हा पुरस्कार देण्यात आला.
तसेच गेल्या वर्षीही अनेक चित्रपट आणि कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले होते. गेल्या वर्षी 67 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये कंगना राणौतला ('मणिकर्णिका' आणि 'पंगा'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री) आणि मनोज बाजपेयी (सर्वोत्कृष्ट अभिनेता) यांना त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी पुरस्कार देण्यात आला होता. तर साऊथचे सुपरस्टार रजनीकांत आणि धनुषलाही राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता. हा पुरस्कार सोहळा दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट
तानाजी : द अनसंग वॉरियर
निर्माता- अजय देवगण
दिग्दर्शक- ओम राऊत
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
गोष्ट एका पैठणीची
दिग्दर्शक- शांतनू रोडे
विशेष उल्लेखनीय फिचर फिल्म
जून (मराठी)
अभिनेता- सिदार्थ मेनन
गोदाकाठ (मराठी)
अवांचित (मराठी)
अभिनेता- किशोर कदम