दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. चित्रपटसृष्टीत सर्वात मानाचा असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराने रजनीकांत यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तर ही बातमी मिळाल्यानंतर आता रजनीकांत यांनी सोशल मीडियावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
रजनीकांत यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत भारत सरकारचे आभार मानले आहेत . "भारत सरकार, आदरणीय आणि प्रियजनांचे मनापासून आभार , नरेंद्र मोदी जी, प्रकाश जावडेकर यांनी मला एवढा मानाचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केल्याने आणि हा पुरस्कार मी माझ्या या प्रवासाचा भाग असलेल्या सगळ्यांना समर्पित करतो. आभार," अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. "पिढ्यांपिढ्या लोकप्रिय, वेगवेगळ्या भूमिका, एक प्रेमळ व्यक्तीमत्.श्री रजनीकांत तुमच्यासाठी..थलायवा यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ही अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यांचे अभिनंदन," अशा आशायाचे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे