मनोरंजन

Thalaivii २०२१ | बॉलिवूडची ‘धाकड गर्ल ’कंगनाचे ‘ तेरी आँखो में’ गाणं रिलीज…

Published by : Lokshahi News

बॉलिवूडची 'धाकड गर्ल' कंगना राणावतच्या (kangna ranaut) 'थलाइवी'(Thalaivii) या चित्रपटाचे 'तेरी आंखो मे हे'गाणं नुकतचं रिलीज झाले आहे. या गाण्यात जयललिता (J. Jayalalithaa) आणि एमजीआर ( J. Jayalalithaa) यांची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटसाठी तिने 20 किलो वजन ही वाढवले आहे.
23 नोव्हेंबर २०१९ रोजी चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज करण्यात आला होता.

हे गाणे पाहून सुपरस्टार कलाकारांच्या प्रतिष्ठीत गाण्यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.'थलाइवी'च्या निर्मात्यांनी शुक्रवारी या गाण्याचे टीजर रिलीज केले होते. त्यानंतर ६० ते ७० च्या दशकातील भारतीय चित्रपटांच्या सोनेरी वर्षांची एक झलक प्रेक्षकांसमोर आणत हे गाणं लाँच करण्यात केले आहे.

कंगना राणावत आणि अरविंद स्वामी यांच्याद्वारे जयललिता आणि एमजीआर यांच्यातील केमिस्ट्री 'तेरी आंखो मे' (Teri Aankhon Mein)या गाण्याद्वारे दाखवण्यात आली. यातून भारतीय चित्रपट सृष्टीतील अनेक ब्लॉकबस्टर्स सुपरस्टार्सना श्रद्धांजली वाहण्यात आली. अरमान मलिक (Armaan Malik) आणि प्राजक्ता शुक्रे ( Prajakta Shukre) यांनी 'तेरी आंखो मे' हे गाणे गायलेय तर जीवी प्रकाश कुमार (G. V. Prakash) यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. शिवाय इरशाद कामिल यांनी हे गाणे लिहिले आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जयललिता यांच्या वास्तविक जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. ज्यात १६ वर्षीय जयललितांचे सिनेमातील पदार्पण पासून ते तमिळ सिनेमातील सुपरस्टारपर्यंतचा प्रवास, शिवाय अम्मा म्हणून असणारी ओळख आणि त्यांचा अविस्मरणीय ऐतिहासिक राजकीय प्रवास मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'थलाइवी'च्या निर्मित्यांनी जयललितांचा अभिनेत्री ते एक यशस्वी राजकीय प्रवास मोठ्या पडद्यावर दाखवत त्यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे. हा चित्रपट १० सप्टेंबर २०२१ रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम

IND vs BAN 1st Test: पहिल्या दिवसाचा खेळ अश्विन आणि जडेजाच्या नावावर

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने