मनोरंजन

‘Money Heist Season 5’च्या दुसऱ्या भागाचा टीझर प्रदर्शित

Published by : Lokshahi News

Money Heist नेटफ्लिक्सवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. शोच्या शेवटच्या हंगामाची घोषणा झाल्यापासून, प्रेक्षक याबद्दल खूप उत्सुक होते. शेवटच्या हंगामाचा पहिला भाग सीझन 5 नेटफ्लिक्सवर आला आहे आणि दुसऱ्या भागाच्या रिलीजची तारीख आधीच ठरवली गेली आहे.

यातच नेटफ्लिक्सने यूट्यूबवर 'मनी हाईस्ट 5'च्या दुसऱ्या भागाचा छोटा टीझर रिलीज केला आहे.नेटफ्लिक्सने या सीरीजचा टीझर आधी स्पॅनिश आणि नंतर इतर भाषांमध्ये रिलीज केला आहे. हा टीझर फक्त 31 सेकंदांचा आहे. टीझरची सुरुवात प्रोफेसर आणि सहकाऱ्यांच्या निराशेने भरलेल्या चेहऱ्याने आणि प्रोफेसरच्या आवाजापासून होते. प्रोफेसर म्हणतात, "गेल्या काही तासांत मी माझ्या जवळच्या दोन लोकांना गमावले. आता मी या चोरीमुळे इतर कोणालाही मरू देणार नाही."या टीझरमध्ये हे स्पष्ट आहे की पहिल्या भागाचे अॅक्शन सीन्स फक्त एक झलक होती, खरा धमाका येणे अजून बाकी आहे.

या टीझरमधील सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे आता प्रोफेसरनेही शस्त्र हाती घेतले आहे. आता प्रोफेसर ताकदीबरोबरच मनाशी लढताना दिसतील. प्रेक्षकांनी या सीरीजदरम्यान प्रोफेसरला फक्त बुद्धी वापरताना पाहिले. टीझर बघून असे वाटते की, या शेवटच्या भागात प्रोफेसरच्या वाट्यालाही काही अॅक्शन सीन्सही येणार आहेत. प्रोफेसर आपल्या टीममधील सदस्यांना वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे.
या अंतिम हंगामाच्या पहिल्या भागात, 'टोकियो' शेवटच्या वेळी मरताना दिसली. मात्र, टोकियो अजूनही जिवंत आहे, याबद्दल सोशल मीडियात कयास बांधले जात आहेत. प्रोफेसरचे सर्व साथीदार मरतील की लष्कराच्या विशेष युनिट बँकेवर झालेल्या हल्ल्यात प्रोफेसर त्यांना वाचवण्याचा मार्ग शोधतील? ज्या सोन्याच्या चोरीसाठी प्रत्येकाच्या जीवाला धोका आहे त्याचे काय होईल? असे अनेक प्रश्न आहेत, ज्याची उत्तरे 'मनी हाईस्ट'च्या सीझन 5च्या दुसऱ्या भागात सापडतील.

अंतिम हंगामाचा पहिला भाग 3 सप्टेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झाला. त्याचा दुसरा भाग 3 डिसेंबर 2021 रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. ही सीरीज स्पॅनिश, हिंदी, इंग्रजीसह इतर अनेक भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर