सोशल मीडिया (Social media) आज कित्येकांसाठी प्रसिद्धी आणि संपत्ती कमावण्याचा एक सर्वात चांगला मार्ग बनला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून रिल्स बनवून अनेक जण भरपूर संपत्ती आणि त्याचबरोबर प्रसिद्धी देखील कमवत आहेत. व्हिडीओ, रील आणि डान्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
असाच एक सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर (Influencer) म्हणजे किली पॉल (Kili Paul). किली पॉल हा टांझानियाचा असून इन्स्टाग्राम इन्फ्लूएन्सर (Instagram influencer) आहे. किली पॉल हा भारतातील गाण्यांवर रील बनवताना दिसतो. किलीवर एका अज्ञात व्यक्तीने लाठयांनी मारहाण करून चाकूने हल्ला केला आहे.
दरम्यान किलीने आपल्या स्वतःच्या अधिकृत अकाउंट वरून त्याच्यावर झालेल्या हल्ल्याविषयी माहिती दिली. किलीने या हल्ल्याचा प्रतिकार केला आणि आपला जीव वाचवून तो त्या ठिकाणाहून पळ काढण्यात यशस्वी झाला. परंतु यामध्ये तो थोडाफार जखमी झाला आहे. दरम्यान हा हल्ला कोणी आणि का केला या विषयी माहिती समजू शकले नाही.
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra modi) यांनी देखील मन की बात (Mann ki baat) मध्ये किली आणि निमाचे कौतुक केले होते. तर टांझानियातील (Tanzania) भारतीय उच्च आयुक्तालयाने देखील किली आणि कॉल यांचा सन्मान केला होता.