KRK vs Anupam Kher Team Lokshahi
मनोरंजन

Anupam Kher : अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना KRK यांचा अनुपमवर निशाणा...

प्रत्येक मुद्द्यावर आपले मत उघडपणे मांडणाऱ्या केआरकेने आता बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांना घेरले आहे.

Published by : prashantpawar1

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते कमाल रशीद खान (Kamal Rashid Khan) आपल्या बेताल वक्तव्यांमुळे बऱ्याचदा चर्चित असतात. प्रत्येक मुद्द्यावर आपले मत उघडपणे मांडणाऱ्या केआरकेने आता बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांना घेरले आहे. खरं तर भारतीय रुपयाची घसरण लक्षात घेऊन कमाल खान (KRK) यांनी अनुपम खेर (Anupam Kher) यांच्यावर निशाणा साधताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांची आठवण करून दिली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की डॉलरच्या आधारावर भारतीय रुपयामध्ये मोठी घसरण झाली आहे. या प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

अशा परिस्थितीत कमाल रशीद खान आपले मत मांडण्यापासून कसे मागे राहू शकतात? केआरकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करत लिहिले की जेव्हा एक डॉलर 56 रुपयांच्या बरोबरीचा असतो तेव्हा देशातील सध्याचे विरोधी पक्षाचे सर्व नेते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका करायचे आणि दुसरीकडे अनुपम खेर तिखट प्रतिक्रिया द्यायचे. . आज जेव्हा एक डॉलर 80.05 रुपये इतका झाला आहे.

मग कोणी काही बोलणार नाहीत. सगळे शांत का बसले आहेत. एवढच नव्हे तर केआरकेने देशाच्या अर्थव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. आणखी एका ट्विटमध्ये केआरकेने लिहिले आहे की आज रुपयाच्या या घसरत्या पातळीबद्दल कोणालाही काळजी नाही. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती काय आहे यावर कोणीही बोलू इच्छित नाही.

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय