मनोरंजन

ब्रेकअपनंतर सुष्मिता सेनची पहिली पोस्ट; सोशल मीडियावर होतेय कॅप्शनची चर्चा

Published by : Lokshahi News

अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या खासगी आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे. सुष्मितानं तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत ब्रेकअप केलं आहे. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिनं याची माहिती दिली होती. आपलं प्रेम बेधडकपणे व्यक्त करणाऱ्या या जोडीनं ब्रेकअप का केलं याची चर्चा सोशल मीडियावर रंगलेली असतानाच आता सुष्मिताची ब्रेकअपनंतरची पहिली इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.

सुष्मितानं तिच्या ब्रेकअपची माहिती इन्स्टाग्रामवरून दिली होती. आता ब्रेकअपनंतर तिची इन्स्टाग्रामवरील पहिली पोस्ट सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या पोस्टवरून सुष्मिता आणि रोहमन यांच्यात बरेच वाद होते असा अंदाज लावला जात आहे. सुष्मितानं इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे.

सुष्मिताचा बॉयफ्रेंड रोहमन त्याच्या मित्राच्या घरी शिफ्ट झाल्यानंतर या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. त्यानंतर सुष्मितानं इन्स्टाग्रामवर रोहमनसोबतचा एक फोटो शेअर करत आपल्या ब्रेकअप माहिती दिली. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, 'आमचं नातं मैत्रीपासून सुरू झालं होतं. आम्ही आजही मित्र आहोत. रिलेशनशिप बऱ्याच काळापूर्वी संपली होती. पण प्रेम अजूनही बाकी आहे.'

सुष्मिताच्या या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी सुष्मिता आणि रोहमनच्या मैत्रीचं कौतुक केलं आहे. सुष्मिता आणि रोहमन यांची जोडी सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय होती. हे दोघंही लवकरच लग्न करतील असं बोललं जात होतं. सुष्मिता आणि रोहमन यांच्या वयात जवळपास १० वर्षांचं अंतर होतं. मात्र तरीही त्यांच्यातील बॉन्डिंग नेहमीच चांगलं होतं. एवढंच नाही तर रोहमन सुष्मिताच्या मुलींना स्वतःचं कुटुंब मानत होता. दरम्यान अद्याप या दोघांचं ब्रेकअप का झालं याचा खुलासा झालेला नाही.

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव