Sushmita sen & Lalit Modi Team Lokshahi
मनोरंजन

दोन महिन्यानंतर सुष्मीता अन् ललित यांच्या नात्यात तेढ...

सुष्मीता सेन आणि ललित मोदी यांच्याबद्दल आता आणखी एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे.

Published by : prashantpawar1

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि आयपीएलचे संस्थापक ललित मोदी (Lalit Modi) यांच्या प्रेमकथेच्या चर्चा काहीशा थांबल्या होत्या की आता आणखी एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. 15 जुलै रोजी ललित मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर घोषणा केली की सुष्मिता आणि ललित हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. ललितच्या या घोषणेनंतर जणू एकच खळबळ उडाली होती. सुष्मिता सेनला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले आणि ललित मोदींची खिल्लीही उडवण्यात आली. पण, आता ललित आणि सुष्मिता यांच्यात काही सुरळीत नसल्याचे दिसून येत आहे.

ललित मोदींच्या अकाऊंटवरून सुष्मिता सेनसोबतचा डीपी डिलीट
आपल्या नात्याची घोषणा होताच ललित मोदींनी आपल्या इन्स्टाग्रामवर सुष्मितासोबतचा डीपी अपलोड केला होता. तसेच, त्याच्या बायोमध्‍ये सुष्‍मिताबद्दल प्रेम व्‍यक्‍त केलं होतं. पण, आता 2 महिन्‍यातच ललित मोदी यांनी आपल्या इंस्‍टाग्रामवरून आपला आणि सुष्‍मिताचा डीपी हटवला आहे. आणि स्‍वत:चा एकट्याचा फोटो टाकला आहे. ज्यावर 'इंडियन प्रीमियर लीग' संस्थापक' ललित मोदींनी आपल्या बायोमधून सुष्मिताचे नावही काढून टाकले आहे. ज्यानंतर दोघांमध्ये काही दुरावा निर्माण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र ललित मोदींनी सुष्मितासोबत पोस्ट केलेले फोटो हटवलेले नाहीत.

ललित मोदींपूर्वी सुष्मिता सेन रोहमन शॉलला डेट करत होती. चाहत्यांनाही दोघांची जोडी खूप आवडली. जेव्हा सुषने रोहमनसोबत ब्रेकअपची घोषणा केली. तेव्हा त्याच्या चाहत्यांना हळहळ व्यक्त केली. मात्र, ब्रेकअपनंतरही सुष्मिता आणि रोहमनमध्ये चांगली मैत्री आहे. दोघे आजही अनेकदा एकत्र दिसतात. नुकताच सुष्मिताने तिची मुलगी रिनीचा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याच्यासोबत रोहमनही दिसला.

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड