लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांची प्रकृती गेली काही दिवस खालावली होती. काही शस्त्रक्रिया आणि वयोपरत्वे आलेले आजारपण यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर आज शनिवार 10 डिसेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुलोचना चव्हाण यांना भारत सरकारने पद्मश्री देऊन सन्मान केला होता.
'फड सांभाळ तुऱ्याला गं आला...' 'पाडाला पिकलाय आंबा..' 'मला म्हणत्यात पुण्याची मैना' यांसारख्या एकाहून एक लावण्या सुलोचना चव्हाण यांनी आपल्या आवाजाच्या जादूने ठसकेबाज केल्या. त्यांच्या पार्थिवावर वाजता आज ३ वाजता मरीन लाईन्सच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. तब्बल ६० वर्षांहून अधिक काळ मराठी रसिक मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.