Subodh Bhave Team Lokshahi
मनोरंजन

'अश्रूंची झाली फुले' नाटक अमेरिकेत हाऊसफुल

धन्यवाद शिकागोकर!'' नुकतीच सुबोध भावेने केली अशी पोस्ट

Published by : Team Lokshahi

सुबोध भावेने ( Subodh Bhave) अमेरीकेच्या 'अश्रूंची झाली फुले' या नाटकातील हाऊसफुल झालेल्या नाट्यगृहातील फोटो शेअर केला आहे. सुबोध भावेच्या 'अश्रूंची झाली फुले' नाटकाचा परदेश दौरा गाजत आहे.

'अश्रूंची झाली फुले' शिकागोचा हाऊसफुल्ल प्रयोग. धन्यवाद शिकागोकर!'' अशी पोस्ट सुबोधने नुकतीच लिहिली आहे.

सुबोधचा अमेरिका दौरा 1 एप्रिलपासून सुरू झाला असून या महिनाभराच्या दौऱ्यात अमेरिकेतील विविध शहरांत 'अश्रूंची झाली फुले'चे प्रयोग होणार आहेत. डेट्रॉईट, न्यूजर्सी, वॉशिंग्टन डीसी, अटलांटा, फिलाडेल्फिया, बोस्टन, सिनसिनाटी, शिकागो, टंपा, सीएटल, लॉस एंजेलीस, बे एरिया, होस्टन, डल्लास, शारलेट येथे प्रयोग होत आहेत.

प्रत्येक शहरातील प्रयोगाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. शिकागोप्रमाणे अटलांटामध्ये जेव्हा या नाटकाचा प्रयोग होता, तेव्हाही सुबोधने गर्दी आणि दर्दी प्रेक्षकांसोबतचा सेल्फी शेअर केला होता. आपलं नाणं एकदम खणखणीत वाजतंय, एकदम टॉप… असेच त्याने जणू सांगितले आहे.

'अश्रूंची झाली फुले'च्या नव्या संचात सुबोध भावे मुख्य भूमिकेत आहे. शैलेश दातार, सीमा देशमुख आणि उमेश जगताप यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हे नाटक सर्वप्रथम प्रभाकर पणशीकर यांनी त्यांच्या नाटय़संपदा संस्थेतर्फे 1966 साली रंगमंचावर आणले होते. पणशीकर यांनी 2002 पर्यंत या सदाबहार नाटकाचे 1111 प्रयोग सादर करून ते अजरामर केले होते. तर काशीनाथ घाणेकर (Kashinath Ghanekar) यांनी नाटकातील लाल्या ही व्यक्तिरेखी अजरामर केली.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result