स्त्री 2 ची चर्चा सध्या जगभरात सुरु आहे. ‘स्त्री’चा पहिला भाग 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. पण ‘स्त्री’च्या पहिल्या भागाची चर्चा आणि पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून कमी प्रतिसाद मिळाला होता. मात्र आता आलेल्या स्त्री 2 ने प्रदर्शनाच्या आधीच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होती. त्यादरम्यान चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.
सर्वाधीक कमार्ई करणाऱ्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 46 कोटी कमाई केली होती. त्यानंतर हा चित्रपट 527.25 कोटींवर पोहचला आणि आता तब्बल 751 कोटींची कमाई करणारा स्त्री 2 हा हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात सस्पेन्स, हॉरर आणि ट्विस्ट यासर्व गोष्टी भरभरून पाहायला मिळाल्या आहेत. या चित्रपटाच्या रिव्ह्यू फार चांगल्या प्रतिसादासह पाहायला मिळत आहे.
चित्रपटातले कलाकार आणि पात्र: या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक असून या चित्रपटात राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी, तमन्ना भाटिया, सुनील कुमार हे कलाकार पाहायला मिळणार आहेत ज्यात राजकुमार रावने विक्की, श्रद्धा कपूरने अनामिक जादूगार, पंकज त्रिपाठीने रुद्र, अपारशक्ती खुरानाने बिट्टू, अभिषेक बॅनर्जीने जना, तमन्ना भाटियाने शमा आणि सुनील कुमार याने सरकटा हे महत्त्वाचे पात्र साकारले आहेत.
चित्रपटाची कथा: या चित्रपटाची सुरुवात चंदेरी या गावापासून होते. स्त्री च्या पहिल्या भागात पाहिल्या प्रमाणे गावातील सगळ्या लोकांमध्ये स्त्रीची दहशत पाहायला मिळाली होती. तसेच ही स्त्री पुरुषांना त्रास देताना पाहायला मिळाली होती, ती कोणाच्या ही वाटेला जाऊ नये किंवा तिच्यामुळे कोणाला ही हानी पोहचू नये यासाठी प्रत्येक जण आपल्या घराबाहेर दारावर किंवा भिंतीवर "ओ स्त्री कल आना" असं लिहायचं.
मात्र यावेळी स्त्री 2 मध्ये स्त्रीची दहशत नव्हे तर सरकटे ची दहशत पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे स्त्रीच्या पहिल्या भागात स्त्री पुरुषांना हानी पोहचवत होती त्याप्रमाणे स्त्री 2 मध्ये सरकटा हा गावातील महिलांना हानी पोहचवताना दिसत आहे. यात या मुलींचे अपहरण होण्यापासून त्या मुलींना वाचवण्यासाठी बिकी, जन्ना, बिट्टू आणि रुद्र पुन्हा एकदा एकत्र येतात. यामध्ये श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावची प्रेमकहाणी सुरु होते.
चित्रपटाचा रिव्ह्यू: चित्रपटाचा रिव्ह्यू फारचं उत्तम आहे. चित्रपट पाहताना सुरुवातीला तुमचे मनोरंजन होईल ज्यामुळे चित्रपट पाहत असताना तुम्ही खळखळून हसाल. यानंतर मध्येच हॉरर सिनमुळे तुमचा थरकाप देखील उडेल. हॉरर कॉमेडीचा एक उत्तम प्रयोग हा चित्रपट आहे. या चित्रपटात सर्व कलाकारांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हा एक अप्रतिम चित्रपट आहे.