गोव्यात 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत(Assembly elections in Goa,) काँग्रेस पक्षाने(Congress) 40 पैकी सर्वाधिक 17 जागा जिंकल्या. भाजपने(BJP) या निवडणुकीत 13 जागांवर विजय मिळवला होता… गोव्यात होणारा पराभव भाजपाच्या वरिष्ठांनी अत्यंत जिव्हारी लावून घेतले आणि त्यांनी रणनिती आखत 'गोवा मिशन' वर नितीन गडकरी(nitin gadkari) यांना पाठवलं होतं… नितीन गडकरी यांनी राजकीय शिष्टाई करत 2 अपक्ष आमदार तसेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पार्टी या दोन पक्षांच्या प्रत्येकी 3 आमदारांनी भाजपला पाठिंबा जाहीर करायला लावून गोव्यात भाजपाचे सरकार आणण्याची रणनिती यशस्वी केली… त्यासाठी दिवंगत मनोहर पर्रिकर यांना पुन्हा गोव्याच्या राजकारणात आणत मुख्यमंत्रीपद दिलं होतं… निवडणुकीत बहुमत नसतानाही मनोहर पर्रिकर(manohar prrikar) यांनी 14 मार्च 2017 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली… भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं पर्रिकर यांना पुन्हा गोव्यात पाठवले आणि हातून निसटेलली सत्ता पुन्हा काबिज केली.. भाजपाच्या राजकीय धुरीणांनी यशस्वी राबवलेली ही रणनिती देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली होती… विधानसभेत काँग्रेस मोठा पक्ष होता, तरीही राज्यपाल मृदुला सिन्हा(Governor Mridula Sinha) यांनी भाजप सरकारला सरकार स्थापनेचं आमंत्रण दिलं. काँग्रेसने याविरुद्ध सुप्रीम कोर्टात(Supreme Court ) याचिका दाखल केली आणि पर्रिकरांचा शपथविधी थांबवण्याची मागणी केली. पण कोर्टाने हा शपथविधी रोखला नाही… न्यायालयाने मनोहर पर्रिकर यांना विश्वासदर्शक ठरावाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. यामुळेच राज्यपालांच्या आणि केंद्रातील भाजपा सरकारच्या भूमिकेवर शंका निर्माण झाली. भाजपाने हे सर्व घडवून आणल्याची चर्चा तेव्हा देशाच्या राजकारणात होती… गोव्यात मागील काळात भाजपाचे सरकार असले तरी गोव्यातील स्थानिकांना काही प्रशअन उपस्थित केल्यास तेथील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.. तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर डॉ. प्रमोद सांवत(Dr. pramod sawant) यांच्याकडे सत्तेची खुर्ची आली… डॉ. सावंत यांच्या नावाला गोव्यात पर्रिकर यांच्या नावाएवढी नक्कीच पसंती नव्हती… त्यामुळे या निवडीनंतर गोव्यातील भाजपामध्ये अंतर्गत धूसफूस सुरू झाली… आत्ताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने सुरूवातीपासूनच फोडाफोडीच्या राजकारणाला सुरूवात केली… जे नेते अन्य पक्षांतून भाजपात आले त्यांनाच भाजपाने तिकीट दिल्यामुळे साहजिकच गोव्यातील भाजपात नाराजीचे सूर उमटले नसते तर नवलंच… भाजपाने मनोहर पर्रिकर यांच्या मुलाला तिकीट न देण्यावरून रंगवलेले राजकारण पाहता त्यांना त्याचा फटका पडेल का? याची चर्चाही आता गोव्याच्या मतदारांत आहे… येत्या १० मार्च रोजी गोव्याच्या मतदारांनी दिलेला कौल उघड होईल… पण तेथील जनमताचा कौल राजकारणी लक्षात घेवू शकतील का? भाजपाच्या रणनितीचा काँग्रेसने पुरता धसका घेतला आहे… त्याचे कारणही पुरेसे आहे, कारण गेल्यावेळी त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास भाजपाने हिरावून घेतला होता… आता त्याची पुनरावृत्ती होण्याची भीती आता नाकारता येत नाही… यावेळी काँग्रेस याबाबतची खबरदारी घेतली आहे… त्यांनी ज्या-ज्या उमेदवारांना तिकीटे दिलीत, त्यांना निवडून आल्यास ते पक्षांतर करणार नाहीत, अशी प्रतिज्ञापत्रे त्यांच्याकडून लिहून घेतलीत…तसेच त्यांना पक्षनिष्ठेच्या शपथाही दिल्या आहेत… भाजपाने मतदानाच्या दुसऱ्या दिवसापासूनच काँग्रेस आमदार तेथील अपक्ष उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.. त्यांच्याशी संपर्क करून सत्तेच्या वाटाघाटीस सुरूवात केली आहे… भाजपाला बहुमत न मिळाल्यास वा तेथे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास भाजपाच्या सोबत कोणते उमेदवार येतील यासाठी भाजपच्या वरिष्ठ धुरिणांनी प्रयत्न सुरू केले आहेत… काँग्रेसने त्यांच्या उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्याने पक्षाचा आपल्यावर विश्वाल नसल्याची नाराजी काँग्रेसची उमेदवारमंडळी आपसात बोलून दाखवत आहेत… सत्तेसाठी कोणी फुटणार का? याबाबतचे संशयाचे वातावरण आत्तापासूनच तयार झाल्याने हा राजकीय धुरळा मतमोजणी आधीच उडू लागलाय…
नरेंद्र कोठेकर